घरदेश-विदेशमाझ्याकडून कोणत्याही चमत्काराची आशा ठेवू नका - प्रियंका गांधी

माझ्याकडून कोणत्याही चमत्काराची आशा ठेवू नका – प्रियंका गांधी

Subscribe

'माझ्याकडून कोणत्याही चमत्काराची आशा ठेवू नका', असे प्रियंका गांधी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या आहेत.

काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील ४१ जागांची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर देण्यात आली आहे. यासाठी प्रियंका गांधी देखील चांगल्याच कामाला लागल्या आहेत. दरम्यान, माझ्याकडून कोणत्याही चमत्काराची आशा ठेवू नका, असे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड येथे प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची आशा न बाळगता मतदारसंघामध्ये चांगले काम करण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी स्थानिक पातळीवर सर्वात जास्त काम करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा –  ‘प्रियंका गांधी फक्त दिसायला सुंदर, राजकीय कर्तृत्व नाही’

- Advertisement -

नेमकं काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

प्रियंका गांधी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर पक्षाला मजबूत करण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक पातळीवरील सर्वसामान्य नागरिकांची कामे करण्याचे प्रियंका गांधींनी केलं आहे. छोट्यातल्या छोट्या गटापर्यंत पक्षाचं काम कसं पोहचेल यावर सर्व निकाल अवलंबून असेल असंही प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. त्याचबरोबर प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘मी या पदावर बसून कोणताही चमत्कार करु शकत नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनीच पक्षाला मजबूत करण्याची जास्त आवश्यकता आहे. राज्यात पक्षाला बळ मिळावं, यासाठी मला तुमची गरज आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -