Live : युपीत काँग्रेस पुर्ण ताकदीनिशी लढणार – राहुल गांधी

काँग्रसेच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून उत्तर दौऱ्यावर असून त्यांच्या भव्य रोड शो लखनऊमध्ये काढला जात आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसोबत, राज बब्बर, ज्योतिरादित्य सिंधियासह इतर नेते उपस्थित आहेत.

Mumbai
priyanka - rahul raod show
रोड शो

तब्बल दोन तासांहून अधिक काळ रोड शो केल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती काँग्रेस शिवाय लढत असल्यातरी आम्ही देखील पुर्ण ताकदीनिशी लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार असे राहुल गाधी यांनी जाहीर केले.


लखनऊ विमानतळ ते काँग्रेस प्रदेश मुख्यालयापर्यंतचा प्रियांकांचा हा १५ किमीचा रोड शो आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसह लखनऊमधील स्थानिकांमध्येही रोड शोबाबतचा उत्साह पाहायला मिळत आहे. रोड शोसाठी खास बस तयार करण्यात आली आहे. ही बस काँग्रेससाठी लकी असल्याचे सांगितले जात आहे.


रोड शो दरम्यान राहुल गांधी यांनी राफेल विमानाची प्रतिकृती हातात घेतली होती. या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

priyanka - rahul raod show
रोड शो

काँग्रसेच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून उत्तर दौऱ्यावर असून त्यांच्या भव्य रोड शो लखनऊमध्ये काढला जात आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसोबत, राज बब्बर, ज्योतिरादित्य सिंधियासह इतर नेते उपस्थित आहेत. विमानतळापासून सुरु झालेला हा रोड शो तब्बल १५ किलोमीटरपर्यंतचा टप्पा पार करणार आहे. प्रियांका गांधी यांच्या येण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला असून नाचत-गातं, ढोलताशा वाजवून ते आपला आनंद व्यक्त करत आहेत.

हेही वाचा –

मोदींना रावण तर राहुलला बनवले राम; काँग्रेसची पोस्टरबाजी

राहुल गांधींवरही बनतोय सिनेमा

जेव्हा राहुल गांधी हे मोदींच्या भाषणाची नक्कल करतात

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here