राहुल गांधींसारखं साहस फार कमी लोकांकडे असतं – प्रियंका गांधी

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

New Delhi
Priyanka Gandhi Vadra appreciate Rahul Gandhi work
राहुल गांधींसारखं साहस फार कमी लोकांकडे असतं - प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये, अशी अनेक पक्षश्रेष्ठ्यांची इच्छा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आलेला पराभव राहुल गांधींच्या जिव्हारी आला आहे. त्यामुळे निवडणूक निकालापासूनच त्यांनी माध्यमांसमोर राजीनामा देणार असल्याचे बोलून दाखवले होते. या सर्व घडामोडींनंतर अखेर त्यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यावर काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी राहुल गांधीचे कौतुक केले आहे. राहुल गांधींसारखे साहस फार कमी लोकांकडे असते, असे प्रियंका म्हणाल्या आहेत.

काय म्हणाल्या प्रियंका गांधी वाड्रा?

राहुल गांधी यांनी आपल्या चार पानी राजीनामा ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांच्या या ट्विटला रिट्विट करत प्रियंका गांधी वाड्रा यांनी राहुल गांधींचे कौतुक केले आहे. फार कमी लोकांना असे काहीसे जमते, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. याशिवाय राहुल गांधींच्या निर्णयाचा आपण आदर करत असल्याचेही प्रियंका म्हणाल्या आहेत. दरम्यान, ‘राहुल गांधी यांनी आपल्या चार पानी राजीनाम्याचे फोटो शेअर करताना लिहिले आहे की, काँग्रेस पक्षासाठी सेवा करणे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. पक्षाकडून आणि देशाकडून मिळालेल्या प्रेमाचा मी आभारी आहे.’ राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन काँग्रेसचा पक्षाध्यक्ष असल्याची माहिती काढून टाकली आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंटवर लोकसभेचा प्रतिनिधी अशीच माहिती सध्या दिसत आहे.