सोनभद्र हत्याकांडावरून राजकारण तापले; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र हत्यांकाडावर राजकारण तापताना दिसत आहे. या हत्याकांडात जे मारले गेले त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी प्रियंका गांधी वाड्रा सोनभद्रला जात होत्या. मात्र, नारायणपूर येथे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Sonbhadra
Priyanka Gandhi Vadra
प्रियंका गांधी वाड्रा

सोनभद्र हत्याकांडावर राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी सोनभद्रला निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना नारायमपूर येथेच अढवले आणि ताब्यात घेतले. यावेळी एएनआय वृत्तसंस्थेने प्रश्न विचारला असता पोलिसांनी विनाकारण आपल्याला अटक केल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. दरम्यान, प्रियंका गांधी यांना अटक केली नसून ताब्यात घेण्यात आल्याचे डीडीपींनी सांगितले आहे. त्यामुळे सोनभद्र हत्याकांडाचे गंभीर पडसाद पडण्याची चिन्हे जाणवू लागले आहेत.

‘भाजपच्या दबावापुढे झुकणार नाहीत’

‘भाजपच्या काळात राज्यात झुंडशाही आणि गुंडगिरी वाढली आहे. मात्र आम्ही भाजपच्या दबावापुढे झुकणार नाहीत. मला विनाकारण अटक करण्यात आली आहे. मी कुठेही जायला तयार आली आहे. मला अटक का करण्यात आली आहे हे मला अध्यापही समजलेले नाही. सोनभद्रमध्ये जे लोक मारले गेले आहेत त्यांच्या भेटण्यासाठी मी आले आहे. त्यात गैर काय आहे?’, असे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

काय आहे सोनभद्र हत्यांकाड प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्याच्या ऊम्भा गावात गोंड आणि गुज्जर समाजाची लोक वास्तव्यास आहे. दोन्ही समाज गावाच्या वेगवेगळ्या भागात राहतात. दोघांच्या वस्तीत ४ किलोमीटरचे अंतर आहे. या चार किलोमीटरच्या अंतरात ९० एकर जमीन आहे. या जमिनीवरुन दोन्ही समाजामध्ये बुधवारी मोठा वाद झाला. यात ११जणांचा मृत्यू झाला. या हत्याकांडावरुन जिल्ह्यातील वातावरण तापले आहे.


हेही वाचा – राहुल गांधींसारखं साहस फार कमी लोकांकडे असतं – प्रियंका गांधी