घरदेश-विदेशअमेरिकेत संसदेत डोनाल्ड्र ट्रम्प समर्थकांचा धुडघूस, एका महिलेचा मृत्यू

अमेरिकेत संसदेत डोनाल्ड्र ट्रम्प समर्थकांचा धुडघूस, एका महिलेचा मृत्यू

Subscribe

अमेरिकन कॉंग्रेसमध्ये इलेक्ट्रोरल कॉलेजला घेऊन बैठकीच्या आधीच गुरूवारी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या समर्थकांनी जोरदार धुडघूस घातला. ट्रंप समर्थकांनी अमेरिकन संसदेत नुकसान केल्याचेही समोर आले आहे. ट्रंप समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे याठिकाणची परिस्थिती बिघडली. त्यानंतर वॉशिंगटन डिसी येथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. आंदोलकांनी केमिकल हल्ला केल्याचीही माहिती आहे. गुरूवारी झालेल्या गोंधळाला ट्रंप समर्थक आणि पोलिसांमध्ये एक हिंसक वळण लागले. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. तर गोळी लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकारही समोर आला आहे.

- Advertisement -

अमेरिकन कॉंग्रेसमध्ये इलेक्टोरल कॉलेजच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे. आजच्या बैठकीत जो बाइडन यांच्या विजयाची घोषणा होणार होती. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेची जगभरातून निंदा करण्यात येत आहे. या सगळ्या हिंसक प्रकारामुळे डोनाल्ड ट्रंप यांचे ट्विटर हॅंडल १२ तासांसाठी लॉक करण्याचा निर्णयही ट्विटरने घेतला. तसेच डोनाल्ड ट्रंप यांनी केलेले तीन वादग्रस्त ट्विट्सही ट्विटरकडून डिलीट करण्यात आले आहेत.

- Advertisement -

 

या संपुर्ण प्रकरणात डोनाल्ड ट्रंप यांनी शांततेचे आवाहन करणारे ट्विटदेखील काही तासांपूर्वी केली आहे. पण संसदेत झालेल्या प्रकारानंतर जो बाइडन यांचा रागदेखील उफाळून आला. लोकशाही आता संपुर्णपणे धोक्या आहेत. म्हणूनच मी डोनाल्ड ट्रंप यांना आवाहन करतो की त्यांनी राष्ट्रीय टेलिव्हिजनवर यावे आणि आपल्या शपथेचे पालन करत संविधानाची रक्षा करावी. कॅपिटलवर झालेल्या हिंसक प्रकारामध्ये खिडक्या तोडणे, संपुर्ण फ्लोरवर ताबा घेणे, तोडफोड करणे हा विरोध नसून गोंधळ घालण्याचा प्रकार आहे असे बाइडन यांनी म्हटले आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी निवड झालेल्या कमला हॅरीस यांनीही डोनाल्ड ट्रंप समर्थकांना युएस कॅपिटलपासून मागे हटण्याची मागणी केली आहे. जेव्हा ट्रंप समर्थक हे पोलिसांसोबत भिडले तेव्हा, हॅरीस यांनी स्पष्ट केले की ट्रंप समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगची सुरक्षा व्यवस्था भंग केली आहे. हॅरीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी कॅपिटल आणि आपल्या देशातील लोक प्रतिनिधींवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकारात बाइडन यांनी केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत आहे. बाइडन यांनी लोकशाहीच्या कामाला सुरू ठेवण्याच्या मागणीला माझे समर्थन असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -