घरCORONA UPDATEपरदेशातून आलेल्या व्यक्तीमध्ये दोन महिन्यांनतर दिसली कोरोनाची लक्षणं, डॉक्टरही हैराण!

परदेशातून आलेल्या व्यक्तीमध्ये दोन महिन्यांनतर दिसली कोरोनाची लक्षणं, डॉक्टरही हैराण!

Subscribe

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका हा महिलांना असतो, त्याचप्रमाणे कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही कोरोना तुमच्या शरीरीत असू शकतो याचे एक उदाहरण समोर आलं आहे. ब्रिटनमध्ये अशीच काहीशी घटना घडली आहे. ब्रिस्बेनमधील डेबी किल्लॉय या महिलेला ८० दिवसांपूर्वी कळले की तिला कोरोना व्हायरस आहे. महिन्याभरापूर्वी कोरोनाची वेदनादायक लक्षणे पाहिल्यानंतर,  नवव्या वेळी देखील तीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

खरतर या आधी अनेकदा तीची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती, परंतु त्याच्या डॉक्टरांना असा संशय आहे की हा विषाणू डेबीच्या शरीरावर बर्‍याच काळासाठी स्थिरावले आहेत. म्हणून, त्यांची पुन्हा पुन्हा चाचणी घेण्यात आली. याविषयी बोलताना डेबी किल्लॉय म्हणाल्या, ‘माला कोरोनाचा खूप त्रास झाला आहे. मी पूर्णपणे सुस्त झाले आहे. मला छातीवर सतत दडपण जाणवते. मला वेगवेगळ्या वेळी नाक,  डोके आणि शरीरात वेदना होतात. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे पूर्ण वेळ मला थकवा जाणवत राहतो. माझी रक्ताची चाचणी, एक्स रे झाले आहे आणि मला आत्ताच बर्‍याच प्रक्रियेतून जावे लागेल.

- Advertisement -

क्वीन्सलँड युनिव्हर्सिटीमधील विषाणूशास्त्रज्ञ प्रोफेसर इयान मॅके म्हणतात की. कोरोना विषाणूचे दीर्घकालीन परिणाम अद्याप माहित नाहीत परंतु बरे झालेल्या रूग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची अनेक घटना घडली आहेत. ते म्हणाले की कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागतो. हे संक्रमण शरीरात किती काळ टिकते हे कोणीच सांगू शकत नाही, परंतु किमान ६ महिने तरी शरीरात राहण्याची शक्यता आहे.’

गेल्या आठवड्यात क्वीन्सलँडमध्ये कोरोना विषाणूची दोन विचित्र घटना घडल्या. या दोन्ही रूग्णांना १४ दिवस नव्हे तर कित्येक महिन्यांसाठी अलग ठेवणे भाग पडले. एक महिलेने क्रूझमधून प्रवास केला, यानंतर या महिलेमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळली. त्यानंतर कोरोनाचे उपचार झाल्यावर या महिलेला १० आठवड्यांनंतर कोरोना विषाणूची लक्षणे दिसून आली. दुसरे प्रकरण म्हणजे क्विन्सलँडमधील आणखी एका महिलेने दोन महिन्यांपूर्वी भारत प्रवास केला होता, परंतु गेल्या आठवड्यात तिला कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यामुळे १४ दिवसांवर किती भरवसा ठेवायचा असा प्रश्न डॉक्टरांसमोर उभा राहिला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – नागपूर पोलिसांना ट्विटरवर शेअर केला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाचा फोटो कारण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -