घरताज्या घडामोडीमराठी इंग्यापुढे कानडी आले ताळ्यावर, ८ दिवसांत महाराजांचा 'तो' पुतळा पुन्हा बसवणार!

मराठी इंग्यापुढे कानडी आले ताळ्यावर, ८ दिवसांत महाराजांचा ‘तो’ पुतळा पुन्हा बसवणार!

Subscribe

बेळगावमध्ये कर्नाटक सरकार मराठी बांधवांवर करत असलेल्या अन्यायाला गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार वाचा फोडली जाऊन देखील हे अन्याय अजून देखील सुरूच आहेत. याचाच एक पुढचा भाग बेळगावमध्ये घडला असून छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा बेळगावच्या मणगुत्ती गावातून हटवण्यात आल्यामुळे तिथलं स्थानिक वातावरण तापलं आहे. हा पुतळा ५ ऑगस्ट रोजी बसवण्यात आला होता. मात्र, तो नक्की का काढला, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. गावातल्याच एका गटाचा या पुतळ्याला विरोध असल्याचं कारण सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, हिंगोली आदी ठिकाणी मोठी आंदोलनं करण्यात आली. मुंबईत देखील शिवसेनेकडून भारतमाता आणि लालबाग परिसरात कर्नाटक सरकारचा निषेध करत आंदोलन केलं. दरम्यान, या प्रकारानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येत्या ८ दिवसांत पुन्हा हा पुतळा बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

महाराष्ट्रभरात तीव्र पडसाद

५ ऑगस्ट रोजी हा पुतळा गावात बसवण्यात आला होता. त्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी देखील घेण्यात आली होती. पण गावातल्याच एका गटाचा त्याला विरोध असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून हा पुतळा हटवण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्याच्या विविध भागात या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलने देखील करण्यात आली. मुंबई, कोल्हापूर, नागपूर, शिर्डी, यवतमाळ, धुळे, हिंगोली, वाशिममध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. जालन्यात देखील छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचं दहन करून आंदोलन करण्यात आलं.

- Advertisement -

घटनेचे तीव्र पडसाद पाहून लागलीच स्थानिक प्रशासनाने पावलं उचलायला सुरुवात केली. तहसीलदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि ग्रामपंचायतीतील ज्येष्ठ मंडळींनी एकत्रित बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू केल्या. या बैठकीत सगळ्यांच्या संमतीने येत्या ८ दिवसांत पुतळा पुन्हा बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -