घरट्रेंडिंगपोलिसांच्या कुत्र्याला उत्तर देण्यासाठी आंदोलकांनी रस्त्यावर आणला सिंह!

पोलिसांच्या कुत्र्याला उत्तर देण्यासाठी आंदोलकांनी रस्त्यावर आणला सिंह!

Subscribe

पोलिसांनी आंदोलकांविरोधात श्वान सोडल्यानंतर आंदोलकांनी थेट सिंहालाच रस्त्यावर उतरवल्याची घटना इराकमध्ये घडली आहे.

कोणत्याही ठिकाणी आंदोलकांना आवरणं अशक्य झाल्यास पोलीस इतर मार्गांचा अवलंब करतात. त्यामध्ये लाठीमार करणे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणे, हवेत गोळीबार करणे असे काही मार्ग आहेत. क्वचित प्रसंगी पोलिसी प्रशिक्षण घेतलेल्या श्वानांचा देखील वापर केला जातो. पण असा वापर करणं हे इराकमधल्या पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. इराकची राजधानी असलेल्या बगदादमध्ये सध्या सरकारविरोधी आंदोलनाचा जोर वाढला आहे. या आंदोलनात आत्तापर्यंत ३०० हून जास्त बळी गेले आहेत. त्यामुळे पोलिसांसाठी हे आंदोलन आटोक्यात येणं आवश्यक झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर तिथल्या पोलिसांनी अखेर पोलीस श्वानांना रस्त्यावर उतरवलं. पण या श्वानांना उत्तर देण्यासाठी आंदोलकांकडून भयानक पाऊल उचललं गेलं. एका आंदोलकाने चक्क सिंहच रस्त्यावर आणला आणि सगळ्यांचीच भंबेरी उडाली!

सिंह की पाळीव कुत्रा!

एक आंदोलक सिंहाला घेऊन जात असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये एक आंदोलक एका सिंहाला कुत्र्याप्रमाणे गळ्यात पट्टा घालून घेऊन जात असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे हा सिंह एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणेच त्या व्यक्तीच्या निर्देशांनुसार वागत आहे. या सिंहाला मध्य-पूर्व इराकचा स्वतंत्र ध्वज गुंडाळण्यात आला असल्याचं देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

इराकमधल्या आर्थिक दुरवस्थेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून सरकारी धोरणांचा निषेध करायला सुरुवात केली आहे. विशेषत: तेल व्यवसायातून मिळणारा पैसा देखील इराकमध्ये रोजगार आणू शकलेला नाही. इराकचे पंतप्रधान अदेल अब्दुल महदी यांनी देखील इराकमधील गरीब आणि विद्यार्थ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं, मात्र त्यानेही आंदोलकांचं समाधान झालेलं नाही. २००३मध्ये अमेरिकेच्या मदतीने इराकमधील सद्दाम हुसेन यांची राजवट उलथवून टाकणाऱ्या विद्यमान राजवटीलाच उलथवून टाकण्याची मागणी आता आंदोलकांकडून करण्यात येत आहे.

एक प्रतिक्रिया

  1. नशीब, आता डायनासोर नाहीत. नाहीतर सिंहाला उत्तर द्यायला पोलीसांनी डायनासोर आणला असता. मोहन देवळे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -