घरताज्या घडामोडी'तू हिंदू आहेस का मुसलमान'? दिल्ली आंदोलकांचा फोटो जर्नलिस्टला प्रश्न

‘तू हिंदू आहेस का मुसलमान’? दिल्ली आंदोलकांचा फोटो जर्नलिस्टला प्रश्न

Subscribe

दिल्लीतली आंदोलकांनी विचारलेला हा प्रश्न माझ्यासाठी सगळ्यात जास्त धक्कादायक अनुभव असल्याचे सांगताना फोटो जर्नालिस्ट म्हणाला की, 'मला फोटो काढत असतानाचा हा अनुभव भयंकर होता.

दिल्लीत CAA आणि NRC विरोधात आजही तणाव कायम असून आंदोलने अजूनही सुरूच आहेत. दिल्लीतल्या मौजपूरमध्ये देखील हिंसाचार थांबलेला नाही. या आंदोलनात एका अग्निशमन दलाच्या जवानाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या सोबतच अशीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका फोटो जर्नलिस्टला आंदोलकांनी ‘तू हिंदू आहेस की मुस्लीम’ असा प्रश्न विचारला आहे.

काय म्हणाला फोटो जर्नसिस्ट?

दिल्लीतली आंदोलकांनी विचारलेला हा प्रश्न माझ्यासाठी सगळ्यात जास्त धक्कादायक अनुभव असल्याचे सांगताना फोटो जर्नालिस्ट म्हणाला की, ‘मला फोटो काढत असतानाचा हा अनुभव भयंकर होता. मी १२.१५ च्या सुमारास मौजपूर येथे पोहचलो त्यावेळी तेथे हिंदू सभेचे काही लोक आले आणि माझ्या कपाळावर टिळा लावला. यामुळे तुमच काम सोप होईल असे ते म्हणाले. तु हिंदू आहेस ना मग हा टीळा लावून घेण्यास काय अडचण आहे तुला? असा प्रश्न देखील त्यांनी मला विचारला. काही वेळाने तेथे दगड फेक सुरू झाली आणि एका इमारतीजवळ आग लावण्यात आली. मी या सर्व गोष्टींचे फोटो आपल्या कॅमेरात काढत होतो. यातच अचानक मला शंकराच्या मंदीराच्या जवळ थांबवण्यात आले, तू हिंदू आहेस ना मग तिथे का जातोस?’ तेथे जाऊ नकोस असे मला सांगण्यात आल्याचे या फोटो जरर्नलिस्टने म्हटल आहे.

- Advertisement -

काय घडले त्यावेळी?

त्या परीसरात बॅरीगेड्स लावण्यात आले होते. तेवढ्यात एक युवक तेथे आला आणि म्हणाला, ‘तू ज्यादा उछल रहा है. तू हिंदू है या मुसलमान?’, असा प्रश्न विचारत ‘तू हिंदू आहेस की मुसलमान ते तपासण्यासाठी आम्हाला तुझी पँट काढून तपासणी करावी लागेल’, अशी धमकी दिली. मात्र, मी शांतपणे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला ; तरीही काही वेळ आणखी वाद घालत नंतर त्यांनी मला सोडून दिले. असे असले तरीही हा सर्व प्रकार माझ्यासाठी फारच धक्कादायक असल्याचे फोटो जर्नलिस्टने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -