घरदेश-विदेशPUBG Ban : पब्जी खेळायला मिळत नाही म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या

PUBG Ban : पब्जी खेळायला मिळत नाही म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या

Subscribe

केंद्र सरकारने PUBG सह ११८ चीनी Apps वर बंदी घातली आहे. यामुळे PUBG खेळणाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने PUBG खेळायला मिळत नाही आहे म्हणून आत्महत्या केली. प्रितम हलदर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.

मृत प्रितम हलदर हा PUBG बॅन झाल्यामुळे नाराज होता, असं त्याच्या आईने सांगितलं. चकदाह पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रितमच्या आईने सांगितलं की, जेव्हा त्या दुपारच्या जेवणासाठी बोलवायला त्याच्या खोलीत गेल्या. मात्र, त्याच्या खोलीची दरवाजा बंद होता. दार ठोठावल्यानंतर देखील दरवाजा उघडला नाही म्हणून शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडला. त्यानंतर खोलीत गेल्यावर तो पंख्याला लटकत असल्याचा दिसला. PUBG बॅन झाल्यामुळे माझा मुलगा उदास होता, असा दावा त्यांनी केला. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, कुटुंबीयांशी बोलल्यानंतर त्यांना वाटतं की PUBG न खेळल्यामुळे प्रीतमने आपला जीव दिला. यामुळे अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -