घरदेश-विदेशआता 'पबजी'वर वेळमर्यादा?

आता ‘पबजी’वर वेळमर्यादा?

Subscribe

पबजी खेळात तास न तास वाया घालवणाऱ्यांच्या सवयीवर लगाम घालण्यात येणार असून आता 'पबजी'खेळणाऱ्यांना वेळेची मर्यादा असणार आहे.

भारतात ‘प्लेयर अननोन बॅटल ग्राउंड’ (पबजी) गेम तरूणाईमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. मनोरंजन आणि मनाच्या समाधानासाठी खेळले जाणारे मोबाईल गेम्स आता जिवघेणे ठरत असून त्यांचा अतिरेक आता जीवावर बेताना दिसत आहे. तसेच या खेळाचे अनेक दुष्परिणाम आतापर्यंत समोर आले असून अनेक तरूणांमध्ये या खेळामुळे हिंसक भावना वाढीस लागत आहे. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने या खेळावर वेळेचीमर्यादा आणण्याचा विचार सुरु आहे. मात्र तसे झाल्यास दिवसभरात केवळ सहा तासाचा हा खेळ खेळता येणार आहे.

पबजी हा गेम खेळण पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या गेमने तरुणांसह शाळेतील विद्यार्थ्यांनाही अ राजकोट पोलिसांनी पबजीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पबजी खेळाक्षरश: वेड लावले असून तरुणांमध्ये हिंसक वृत्ती वाढत आहे. याशिवाय या गेममुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम होत आहे. सामाजिक सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये यासाठी पबजी गेमवर बंदी घालण्यात येत आहे’, असे पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ आणि कलम ३७ (३) अंतर्गत कारवाई केली जाई असा इशाराही पोलिसांनी दिला होता. गुजरातमधील राजकोट आणि सूरज या दोन शहरात राज्य सरकारने पबजीवर बंदी घातली आहे. तसेच देशातील इतर राज्यांतूनही पबजीवर बंदी घालण्याची सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पबजी खेळावर वेळेची मर्यादा घालण्यासाठी हालचाली सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पबजी खेळात तास न तास वाया घालवणाऱ्यांच्या सवयीवर लगाम लागणार आहे.

- Advertisement -

वाचा – पबजी खेळू नको म्हटल्यामुळे, थेट आत्महत्येचा प्रयत्न

वाचा – गुजरातमध्ये ‘पबजी’ खेळणाऱ्या ३ जणांना अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -