घरदेश-विदेशPUBG Mobile: भारतात आजपासून PUBG गेमवर बंदी, कंपनीने केला खुलासा

PUBG Mobile: भारतात आजपासून PUBG गेमवर बंदी, कंपनीने केला खुलासा

Subscribe

पबजी मोबाइल आणि पबजी मोबाइल लाइट ३० ऑक्टोबरपासून भारतात पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. कंपनीने गुरुवारी फेसबुकवरील पोस्टमध्ये याची माहिती दिली. सुमारे एक महिन्यापूर्वी भारताने ११८ चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. या ११८ अॅप्सपैकी नावाजलेले गेमिंग अ‍ॅप पबजीला भारतातही बंदी घातली गेली. भारताने गेमिंग अ‍ॅप पबजीसह ११८ चीन अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. हे अ‍ॅप्स देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात असे भारताचे म्हणणे आहे. यापूर्वी दोनदा भारताने चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. देशाची सुरक्षा, अखंडतासाठी या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान ही घोषणा अशावेळी करण्यात आली जेव्हा पबजी मोबाइलचे डेव्हलपर पबजी कॉर्पने लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की बॅटल रॉयल स्टाइव गेम्स भारतात येण्याची शक्यता आहे. मोबाईल गेमच्या मालकीच्या टेंन्सेन्ट गेम्सने (Tencent Games) फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही अत्यंत खेदाची बाब आहे. यासह, त्यांनी भारतातील पबजी मोबाइल आणि पबजी मोबाइल लाईट फॅन्सचे आभार मानले. कंपनीने असेही म्हटले आहे की यूजर्सच्या डेटाचे संरक्षण करणे नेहमीच त्यांचे प्राधान्य राहिले असून त्यांनी नेहमीच भारतात लागू असलेल्या डेटा संरक्षण कायद्यांचे आणि नियमांचे पालन केले आहे.

- Advertisement -

निवेदनात असेही म्हटले आहे की, आमच्या गोपनीयता धोरणात असे सांगितले आहे की, सर्व यूजर्सची गेमप्ले माहितीची पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. निवेदनात असे म्हटले आहे की, टेंन्सेट पबजी मोबाइलचे डेव्हलपर क्राफ्ट्स गेम युनियनची कंपनी असलेल्या पबजी कॉर्पोरेशनला सर्व हक्क परत करत आहेत.


पबजीसह ११८ चीनी Apps बंदीनंतर ड्रॅगनने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -