घरदेश-विदेशPulwama attack - मुलांनो बंदूक उचलाल तर मारले जाल

Pulwama attack – मुलांनो बंदूक उचलाल तर मारले जाल

Subscribe

काश्मिरी तरुणांच्या हातात बंदूका आढळल्यास त्यांना मारले जाईल असे वक्तव्य भारतीय सैन्याचे अधिकारी ढिल्लन यांनी केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असणाऱ्या काश्मिरी नागरिकांवर दया केली जाणार नसल्याचे वक्तव्य भारतीय सेनेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैन आणि सीआरपीएफ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पुलवामा येथील हल्ल्यात पाकिस्तानचा ही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादा मार्ग सोडून शरण आलेल्या काश्मिरी तरुणांसाठी आम्ही चांगले उपक्रम राबवत आहोत, मात्र दहशतवादा पाठिंबा देणाऱ्या तरुणांवर दया केली जाणार नसल्याचे सैन्याचे अधिकारी ढिल्लन  यांनी सांगितले. पुलवामा येथील हल्ल्यानंतर १०० तासांमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

काय म्हणाले सैन्य अधिकारी

“दहशतवादाच्या मार्गावर चालणाऱ्या काश्मिरी तरुणांना त्यांच्या मातांनी योग-अयोग्य काय याची जाणीव करून दिली पाहिजे. तरुणांनी दहशत वादाचा मार्ग सोडून शरणागती पत्करने गरजे आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेचे पाकिस्तानबरोबर साटे लोटे आहे यामधअये आम्हाला जराही शंका नाही.” – सैन्य अधिकारी,ढिल्लन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -