घरदेश-विदेशसिद्धूला शोमधून काढा; नेटकऱ्यांचा कपिल शर्माला इशारा

सिद्धूला शोमधून काढा; नेटकऱ्यांचा कपिल शर्माला इशारा

Subscribe

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याबद्दल नवज्योत सिद्धू यांनी आपले मत मांडल्यानंतर त्यांना 'कपिल शर्मा शो' मधून काढून टाकावे अन्यथा शो बंद करू, असा इशारा नेटकऱ्यांनी दिला आहे.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशदवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ४० पेक्षा जास्त सीआरपीएफचे जवान शहीद झाले.  यामुळे देशातील प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होते. या हल्ल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर अनेक राजकीय नेते, सेलिब्रेटी मंडळींनी देखील सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली होती. याचवेळी नेटकऱ्यांनी कपिल शर्मावर निशाणा साधला आहे.

नवज्योत सिंग सिद्धूवर नेटकऱ्यांची टीका

‘पाकिस्तानशी चर्चा करुन तोडगा काढावा. दहशवादाला धर्म, देश नसतो’,असे वक्तव्य काँग्रेस मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्याबद्दल केले. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. नवज्योत सिद्धू हे ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परिक्षक म्हणून काम पाहात होते. त्यामुळे या शो मधून नवज्योत सिद्धू यांना काढून टाकावे, अन्यथा शो बंद पाडण्यात येईल, अशी धमकी वजा सूचना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -

 

twitter
नेटीझन्सच्या प्रतिक्रीया

देशभरातून हल्लयाचा निषेध 

अलिकडच्या काळातील सर्वात मोठी घटना असून उरी हल्ल्यापेक्षा हा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यानंतर देशभरातून सूड घेण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे. मुबंईतील अनेक ठिकाणी या ह्लल्याचा निषेध करत कँडल मार्च काढण्यात आला. तसेच पाकिस्तान विरोधात घोषणा करत पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशदवादी संघटनेने घेतली आहे. जैशच्या दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या जवानांच्या बसला जोरदार धडक दिली. त्यावेळी स्फोट होऊन घटनास्थळी रक्त-मांसाचा सडा पडला. ही घटना श्रीनगर-जम्मू हायवेवरील लाटूमोडमध्ये अवंतीपुरा भागात घडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -