घरदेश-विदेशपुलवामामध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामामध्ये चकमक; ४ दहशतवाद्यांचा खात्मा

Subscribe

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच आहे. गेल्या दोन दिवसापासून पुलवामा भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. जवानांना पुलवामा जिल्ह्यातील हाजिन राजपोर भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. त्याठिकाणी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान चकमक अद्याप सुरु आहे.

- Advertisement -

शुक्रवारी एका दहशतवाद्यांचा खात्मा

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चकमक अद्यापही सुरुच आहे. याआधी शुक्रवारी सकाळी पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलाने दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोराच्या बांदेरपुरा भागामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होत्या त्यानंतर घटनास्थळावर चर्च ऑपरेश सुरु केले. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरु झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले होते.

कठुआमधून २ एके ४७ रायफल जप्त

दुसरीकडे, कठुआच्या रामकोट येथे सर्च ऑपरेशन दरम्यान जवानांना काळ्या रंगाच्या एका पिशवीमध्ये २ एके ४७ रायफल आणि युध्दासाठी वापरले जाणारे सामान सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. काळ्या रंगाच्या एका पिशवीला जमिनीमध्ये पूरण्यात आले होते. जवानांना थेह आणि दाबी गावाच्या दरम्यान हा शस्त्रसाठा सापडला.

- Advertisement -

हेही वाचा – 

पुलवामामध्ये चकमक; एका दहशतवाद्याचा खात्मा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -