घरदेश-विदेशPulwama Terror Attack : सचिन तेंडुलकरने व्यक्त केला संताप

Pulwama Terror Attack : सचिन तेंडुलकरने व्यक्त केला संताप

Subscribe

संपुर्ण जग १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डे साजरा करत असतो. मात्र भारताच्या इतिहासात १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस काळा दिवस म्हणून आठवणीत ठेवला जाईल. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. भारतासहीत जगभरातून या घटनेबद्दल आक्रोश व्यक्त केला जात आहे. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. एका बाजुला या हल्यात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंब शोक व्यक्त करत असतानाच दुसऱ्या बाजुला राजकीय नेते, सेलिब्रिटी, खेळाडू आपला संताप व्यक्त करत शहीदांना मानवंदना देत आहेत.

- Advertisement -

 

भारतीय क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ट्विटरवर आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्यो तो म्हणतो, “पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. या हल्ल्याचे वृत्त समजात मला दुःख झाले. या हल्ल्यात ज्या लोकांनी आपले प्राण गमावले त्या लोकांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. जे जखमी आहेत त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. देशाच्या जवानांना आणि त्यांच्या सेवेला माझा सलाम!”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -