घरदेश-विदेशकैद्यांच्या हातचे जेवण खा, तुरूंग योग टाळा !

कैद्यांच्या हातचे जेवण खा, तुरूंग योग टाळा !

Subscribe

कैद्यांच्या हातचे जेवण खा! तुरूंग योग टाळा! हो हे खरे आहे. तुमच्या पत्रिकेत तुरूंग योग आहे? मग, कैद्यांच्या हातचे जेवण खाल्ल्यानंतर हा योग टाळता येणार आहे. पंजाबमध्ये आता नवीन फॅड सध्या लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कैद्यांच्या हातच्या जेवणाला देखील ‘अच्छे दिन’ आल्याचे पाहायला मिळत आहे. कैद्यांच्या हातचे जेवण खाण्यासाठी वाढती गर्दी पाहता कारागृह मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी तुरूंगाच्या बाहेर कॅन्टीन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कैद्यांच्या हातच्या जेवणाला मागणी का?

तुमच्या पत्रिकेत तुरूंग योग असल्यास तो टाळण्यासाठी कैद्यांच्या हातचे जेवण खा, असा सल्ला ज्योतिषांकडून दिला जात आहे. त्यामुळे संभाव्य तुरूंगवारी टाळण्यासाठी कैद्यांच्या हातून बनवलेले जेवण जेवण्याकरता पंजाबमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यानंतर कैद्यांच्या हातच्या जेवणाला वाढती मागणी पाहता कारागृहमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी कॅन्टीन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय या कॅन्टीनच्या माध्यमातून उभा राहणारा निधी हा कैद्यांकरता विविध योजना राबवण्यासाठी वापरला जाणार आहे.

- Advertisement -

कुठे-कुठे सुरू होणार कॅन्टीन?

लुधियाना, अमृतसर आणि जालिंधर या शहरांमधल्या तुरूंगांच्या बाहेर प्रायोगिक तत्त्वावर कॅन्टीन सुरू केले जाणार आहेत. या तीन शहरांमधल्या कॅन्टीन्सना मिळणाऱ्या प्रतिसादावर राज्यातल्या इतर २७ शहरांमध्ये देखील अशाच प्रकारचे कॅन्टीन्स सुरू केले जाणार आहेत. ज्यामध्ये सेंट्रल आणि जिल्ह्यातल्या तुरूंगांचा देखील समावेश असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला मिळणारे जेवण उत्तम प्रतीचे असणार आहे.

कुख्यात गुंड, गँगस्टर्सवर विशेष लक्ष

यावेळी कुख्यात गुंड आणि गँगस्टर्स यांच्यावर विशेष लक्ष राहणार आहे. मोबाईल फोन्स किंवा ड्रग्स सापडल्यास जेलरला जबाबदार पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मंत्री रंधवा यांनी स्पष्ट केले. शिवाय तुरूंगात मोबाईल जॅमर लावण्यासाठी केंद्राकडे विनंती केल्याचे कारागृहमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -