घरदेश-विदेशपंजाबचे 'हे' मंत्री आढळले कोरोना पॉझिटिव्ह; काल राहुल गांधींसोबत होते आंदोलनात

पंजाबचे ‘हे’ मंत्री आढळले कोरोना पॉझिटिव्ह; काल राहुल गांधींसोबत होते आंदोलनात

Subscribe

पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचे जोरदार आंदोलन सुरू आहे. या गरमागरमीत पंजाबचे आरोग्य मंत्री बलबीर सिद्धू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बलबीर सिद्धू हे काल, सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासोबत संगरूरच्या रॅलीत सहभागी झाले होते. काँग्रेच्या वतीने ‘शेती वाचवा आंदोलना’चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात स्टेज सेक्रेटरी म्हणून बलबीर सिद्धू यांनी जबाबदारी पाहिली होती. ते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याही संपर्कात आले होते.

नेमके काय घडले 

आज सकाळी आरोग्य मंत्री बलबीस सिद्धू यांना प्रकृती अस्वास्थ्य आढळून आले. त्यांना ताप तसेच अंगदुखीसारखी कोरोनाची लक्षणेही जाणवली. ‘आज सकाळपासून मला बरं वाटत नव्हते. त्यामुळे मी स्वत:ची चाचणी करवून घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी आपल्या घरातच आयसोलेट होण्याचा निर्णय घेतला’, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बलबीर सिद्धू यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनीही लवकरात लवकर करोना टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

- Advertisement -

संसदेतील पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकाला पारीत केल्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी त्यावर नाराजी दर्शवली. देशभरात या विधेयकाविरोधात आंदोलने करण्यात आली असून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक निदर्शने केली. दरम्यान, काँग्रेसने पंजाबमध्ये ट्रॅक्टर यात्रा आयोजित केली असून यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सहभागी झाले आहेज. काल, सोमवारी पंजाबमधील भवानीगडपासून समानापर्यंत या ट्रॅक्टर यात्रेला सुरूवात झाली. यावेळी शेतकऱ्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची संपूर्ण व्यवस्थाच बिघडवून टाकली असल्याची टीका राहुल रांधी यांनी केली.

हेही वाचा –

Hathras Rape Case : उत्तर प्रदेश सरकारचे सर्वोच्च न्यायालयात गंभीर दावे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -