घरट्रेंडिंग'उत्तरपत्रिकेत ठेवा शंभराची नोट', विद्यार्थांना मुख्याध्यापकांचा सल्ला!

‘उत्तरपत्रिकेत ठेवा शंभराची नोट’, विद्यार्थांना मुख्याध्यापकांचा सल्ला!

Subscribe

मुख्याध्यापक विद्यार्थांना बोर्डाच्या परीक्षेत पास होण्यासाठी कशा प्रकारे अयोग्य पद्धत वापरू शकतो हा सल्ला देण्यात व्यस्त असतानाच, एका विद्यार्थानेच मुख्याध्यापकांच्या नकळत हा व्हिडिओ रेकॉड केला आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत योग्य सल्ला आणि मार्गदर्शन हे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महत्वाचे ठरते. मात्र, उत्तर प्रदेश मधील एका खासगी शाळेत चक्क शाळेचे मुख्याध्यापकच विद्यार्थांना ‘उत्तरपत्रिकेत शंभराची नोट ठेवा, मग तुम्ही नक्की पास होणार’ अस आश्वासन देतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी सोशल मिडीयावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत याचा निषेध केला आहे.

- Advertisement -

व्हिडिओ कसा केला शूट? 

मागील काही दिवसांपूर्वीच बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या असून, उत्तर प्रदेश मधील या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्याध्यापक विद्यार्थांना बोर्डाच्या परीक्षेत पास होण्यासाठी कशा प्रकारे चुकीची पद्धत वापरू शकतो हा सल्ला देण्यात व्यस्त असताना, एका विद्यार्थाने शिक्षकांच्या नकळत हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. ‘प्रवीण माल’ हे उत्तर प्रदेशातील लखनौ पासून ३०० किमी अंतरावर असलेल्या माऊ जिल्ह्यातील एका खासगी शाळेचे व्यवस्थापक तसेच मुख्याध्यापक आहेत. यावर्षी उत्तर प्रदेशातील सरकारने कॉपी करणाऱ्या विद्यार्थांसाठी नियम अधिक कठोर करण्याचे ठरवले असताना अनेकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओत?

या व्हिडिओत मुख्यध्यापक म्हणत आहेत की, “माझा कोणताही विद्यार्थी हा परीक्षेत नापास होणार नाही, त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मागे सोडू नका, उत्तर पत्रिकेत केवळ शंभराची नोट ठेवा मग शिक्षक तुम्हाला हमखास गुण देणार. जरी तुमचे एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकले असले आणि तो प्रश्न चार गुणांसाठी असेल तर तुम्हाला त्यापैकी तीन गुण दिले जातील, याचे मी तुम्हाला आश्वासन देतो”, अशा शब्दातील मुख्यध्यापकांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

परीक्षा केंद्रांवर चोख व्यवस्था 

या वर्षी उत्तर प्रदेशातील सरकारने परीक्षा केंद्रावरील कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी २ लाख सुरक्षा अधिकारी नेमले आहेत. तसेच राज्यातील ७५ जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर २ लाख सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. UPSB बोर्डाने राज्यातील ९३८ ही संवेदनशील तर ३९५ ही अतिसंवेदनशील केंद्रे असल्याचे एका अहवालात स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ पोस्ट केल्यावर सोशल मिडीयावरून अनेकांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -