Thursday, August 6, 2020
Mumbai
26 C
घर ताज्या घडामोडी धक्कादायक! क्वारंटाईनमध्ये चक्क सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण

धक्कादायक! क्वारंटाईनमध्ये चक्क सेक्स रॅकेट; अनेकांना कोरोनाची लागण

परदेशातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांसाठी क्वारंटाईनची हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. मात्र. त्याच क्वारंटाईन सेंटरमध्ये चक्क सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.

Melbourne
30 year old sex worker killed in Nagpada
संतापजनक! क्वॉरंटाईन सेंटरमध्ये चक्क सेक्स; अनेकांना कोरोनाची लागण

जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशात २० हजार ९०३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख २५ हजार ५४४ वर पोहोचली असून मृतांची संख्या १८ हजार २१३ झाली आहे. तसेच २ लाख २७ हजार ४३९ active केसेस असून ३ लाख ७९ हजार ८९२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी संशयित, परदेशातून प्रवास करुन आलेल्या नागरिकांसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या हॉटेलमध्येच सेक्स रॅरेट सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही घटना ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये घडली आहे.

मेलबर्नमधील काही हॉटेल्स हे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरले जात आहेत. मात्र, त्याच हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे समोर आले. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार; ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधील हॉटेलमध्ये परदेशातून येणाऱ्या लोकांना ठेवण्यात आले होते. मात्र, हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु करण्यात आल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाली. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या हलगर्जीपणाचा असल्याचे म्हटले जात आहे. क्वॉरंटाइन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक होण्याच्या काही तास आधीच सूचना देऊन प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे एका सुरक्षा रक्षकाने म्हटले. क्वारंटाईन सेंटर असलेल्या हॉटेलमध्ये बाहेरून सेक्स वर्कर्स आल्या असतील आणि त्यातून करोनाचा फैलाव झाला असू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तर, प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या मते सेक्स रॅकेटमुळे करोनाची बाधा झालेल्यांची संख्या चिंताजनक नाही. मात्र, तरीदेखील हा प्रकार धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातून ऑस्ट्रेलियातून येणाऱ्या नागरिकांपैकी पाच ते १० टक्के जणांना संसर्ग होऊ शकतो या अंदाजाने तयारी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियात परदेशातून जवळपास ६० हजार नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.


हेही वाचा – देशात २४ तासांत २० हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; ३७९ जणांचा मृत्यू