घरदेश-विदेशLockDown: विमान प्रवासावर प्रश्नचिन्ह! ७ विमानांमध्ये १७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

LockDown: विमान प्रवासावर प्रश्नचिन्ह! ७ विमानांमध्ये १७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

Subscribe

देशांतर्गत एक तृतीयांश भागासह २५ मे पासून ही विमान सेवा सुरू

देशांतर्गत एक तृतीयांश भागासह २५ मे पासून विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी नागरी उड्डयन मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विविध हवाई कंपन्यांनी दावा केला होता की, विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोविड -१९ च्या विरोधात त्यांनी सर्व खबरदारी आणि सुरक्षा व्यवस्था केली आहे.

७ विमानांमध्ये १७ कोरोना पॉझिटिव्ह

परंतु, असे असले तरी विमान प्रवास सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दिवसापासून या विमानांमध्ये कोरोनाची प्रकरणं आढळून येत आहेत. आतापर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह ७ विमानांमध्ये १७ कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

तीन दिवसांत इंडिगोच्या चार उड्डाणांमध्ये १२ कोरोना संक्रमित प्रवासी आढळले असून स्पाइस जेटच्या एकाच उड्डाणात २ कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत तर अलायन्स एअरमध्ये देखील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय एअर इंडियाच्या दोन क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाली आहे.


धक्कादायक! विमान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; १४ क्रू मेंबर्सना केले होम क्वॉरंटाईन

विमान प्रवास सुरू, मात्र कोरोनाची भीती 

देशातील लॉकडाऊन दरम्यान बस, रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर २५ मेपासून देशांतर्गत विमान सेवाही सुरू झाली आहे. साधारण दोन महिन्यांपासून विमान सेवा स्थगित झाल्यानंतर देशांतर्गत विमानांचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. यावेळी प्रवाशांमध्ये उत्साह असला तरी त्यांना कोरोनाची भीती देखील आहे.

- Advertisement -

मार्गदर्शक सूचनांचे करावे लागणार पालन

मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रवाशांना विमान प्रवास सुरू होण्याच्या २ तास आधी विमानतळावर पोहोचावे लागणार आहे. केवळ तेच प्रवासी विमानतळ टर्मिनलमध्ये प्रवेश करू शकतील, ज्यांचे उड्डाणं ४ तास किंवा त्याआधी असतील. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त ऑनलाईन चेक-इन म्हणजेच वेब तपासणीची सुविधा देण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -