घरदेश-विदेशमुकेश अंबानींनंतर राधाकृष्ण दमानी ठरले भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती

मुकेश अंबानींनंतर राधाकृष्ण दमानी ठरले भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती

Subscribe

शेअर बाजार ज्येष्ठ गुंतवणूकदार आणि डी-मार्ट रिटेल चेन चालवणार्‍या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी हे भारतातील दुसरे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांचं एकूण उत्पन्न 17.5 अरब डॉलर म्हणजेच जवळपास 1,25,000 कोटी रुपये आहे. त्यांनी शिव नाडर, गौतम अदाणी यांना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत ते दुसर्‍या क्रमांकावर जाऊन बसले आहे. देशाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहेत, त्यांचे एकूण उत्पन्न 57.4 अरब डॉलर इतकं आहे.

फोर्ब्स रियल टाईम बिलिनियरीज इंडेक्सनुसार, गेल्या आठवड्यात एव्हेन्यू सुपरमार्केटचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले. त्यामुळे दमानी यांच्या उत्पन्नात वाढ झाली. शनिवारी दमानी यांचं उत्पन्न 17.8 अरब डॉलर पर्यंत पोहोचलं. त्यांच्यानंतर श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलचे शिव नाडर (16.4 अरब डॉलर), उदय कोटक (15 अरब डॉलर) आणि गौतम अदाणी (13.9 अरब डॉलर) यांचा क्रमांक लागतो.

- Advertisement -

राधाकृष्ण दमानी हे नेहमी पांढरं शर्ट आणि पांढरा पँट घालतात आणि त्यांची ही स्टाईल त्यांची ओळख आहे. त्यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखलं जातं. ते शेअर बाजारातील एक प्रसिद्ध जानकार आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांनी त्यांच्या व्यवहारी ज्ञानाच्या जोरावर डी-मार्ट ला देशातील यशस्वी रिटेल चेन चालवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -