घरदेश-विदेशनवी दिल्लीत महिला आरजेचा वियभंग

नवी दिल्लीत महिला आरजेचा वियभंग

Subscribe

नाईट शिफ्ट करुन रात्री उशीरा घरी परतणाऱ्या एका महिला आरजेचा विनयभंग केल्याची घटना नवी दिल्लीमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे.

स्त्रियांच्या, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ओळखीतील, नात्यातील लोकांकडून देखील आता मुलींवर आणि महिलांवर अत्याचाराच्या, बलात्काराच्या आणि विनयभंगाच्या घटना वाढताना दिसत आहेत. दरम्यान, अशीच एक घटना नवी दिल्लीमध्ये घडल्याचे उघडकीस आले आहे. नाईट शिफ्ट करुन रात्री उशीरा घरी परतणाऱ्या एका महिला आरजेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. राहत्या घराच्या इमारतीचा सुरक्षा रक्षक आणि कामगार कल्याण विभागाच्या अध्यक्षांनी विनयभंग केल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

नवी दिल्लीतील ग्रेटर कैलाश येथे ही तरुणी आपल्या आई वडील आणि मुलाबरोबर राहते. ती आरजे असल्यामुळे तिला नाईट शिफ्ट असून ती रात्री उशीरा घरी परतते. अशीच ती एकदा नाईट शिफ्ट करुन घरी परतली. ती इमारतीच्या गेटवर आल्यावर तिच्या उशीरा येण्यावरुन कॉलनीच्या सुरक्षा रक्षकाने तिला अडवले. तसेच इतक्या रात्री कुठलीही महिला कशी एकटी घरी येते. तू नक्की काय काम करतेस. तेही मला माहित नाही‘, असे म्हणत तिला अडवले. दरम्यान, कामगार कल्याण विभागाचे अध्यक्ष मिकी बेदी देखील त्यावेळी त्याठिकाणी आले आणि त्यांनीही तिच्यासोबत गैरवर्तन करत आक्षेपार्ह शेरेबाजी केली, असा आरोप महिलेने केला आहे. तसेच या दोघांनी आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याचे तिने म्हटले आहे. याप्रकरणी महिला आरजेने ग्रेटर नोएडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून अद्याप संबंधितांवर एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.

- Advertisement -

आईने नोंदवली तक्रार

महिलेच्या आईने ही तक्रार दाखल केली आहे. ‘माझी मुलगी मीडिया कर्मचारी असून सिंगल मदर आहे. ती आरजे असल्यामुळे ती कामावरुन रात्री उशीरापर्यंत घरी येते. ती उशीरा येण्यावरुन आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून तिला टोमणे मारत असतात. घरात मी आणि माझे यजमान, असे दोन ज्येष्ठ नागरिक असून आम्हाला ही एकच मुलगी आहे. तरी कृपया संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी‘, अशी विनंती आरजेच्या आईने पोलिसांना केली आहे.


हेही वाचा – रुबेला लसीकरणादरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग

- Advertisement -

हेही वाचा – कॅनडीयन महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -