आज राफेल विमानं भारतीय हवाई दलात अधिकृतरित्या दाखल होणार

rafale fighter aircraft will include in indian air force today
आज राफेल विमानं भारतीय हवाई दलात अधिकृतरित्या दाखल होणार

आज राफेल लढाऊ विमानांचा भारतीय हवाई दलात अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. फ्रान्सहून २९ जुलै रोजी अंबाला एअरबेसवर पोहोचलेले पाच राफेल लढाऊ विमानं अधिकृतरित्या भारतीय वायुसेनाचा भाग घेतली. यासाठी अंबाला एअरबेसवर कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली हे प्रमुख पाहुणे असतील. राफेल विमानं वायुसेनाच्या १७व्या स्क्वॉड्रन, ‘गोल्डन एअरो’चा भाग असतील. यावेळी तेजस विमानांसह रंगीबेरंगी एअर शो देखील असणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंबाला एअरबेसच्या आजूबाजूला परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील विविध ठिकाणी नाका उभारण्यात आला आहे.

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्यासह सीडीएस जनरल बिपिन रावत, हवाई दलाचे प्रमुख आर.के.एस भदौरिया, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, संरक्षण विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी सतीश रेड्डी, अनेत वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. तसेच या भारतीय हवाई दलाच्या इतिहासात नोंद होणाऱ्या या मोठ्या कार्यक्रमात भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनिन, हवाई दल प्रमुख एरिक ऑटेलेट देखील उपस्थित असतील.

याशिवाय हरयाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य, केंद्रीय मंत्री रतनलाल कटारिया, मुख्यमंत्री मनोहर लाल, गृहमंत्री अनिल विज या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात सर्वधर्म पूजा करण्यात येणार आहे. यादरम्यान राफेल आणि तेजस विमानं प्रात्यक्षिकं दाखवतील. यामध्ये सारंग एअरोबेटिक टीमचाही समावेश असेल. या कार्यक्रमानंतर भारत आणि फ्रान्सच्या शिष्टमंडळाची द्विपक्षीय बैठक असेल.


हेही वाचा – चीनने घुसखोरी केली तर चोख उत्तर मिळेल; भारताचा इशारा