घरदेश-विदेशआज भारतीय भूमीत Rafale Fighter Jet होणार लॅण्ड!

आज भारतीय भूमीत Rafale Fighter Jet होणार लॅण्ड!

Subscribe

भारत सरकारने हवाई दलासाठी ३६ राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला होता.

फ्रान्सहून रवाना झालेले पाच राफेल लढाऊ विमान आज भारताला मिळणार आहेत. आज दुपारी एक ते तीन दरम्यान कोणत्याही वेळी राफेल लढाऊ विमान अंबाला एअरबेसवर दाखल होणार आहे. भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया आज अंबाला एअरफोर्स स्टेशनवर पाचही राफेल लढाऊ विमानांचे स्वागत करतील. यावेळी लहानसा कार्यक्रम करून राफेल विमानं हवाई दलात सामील केले जाणार आहेत.

दरम्यान, ही पाच राफेल लढाऊ विमान साधारण ७ हजार किमी प्रवास करुन त्यांची पहिली बॅच आज अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन इथे दाखल होतील. भारतात येताना विमाने ३० हजार फूट उंचीवर असताना त्यात इंधन भरण्यात आले होते. अंबाला एअरफोस्ट स्टेशन परिसरात गर्दी होण्याची शक्यता असल्याने हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने इथे कलम १४४ अर्थात जमावबंदी लावण्यात आले आहे. यावेळी मीडियालाही या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी नाही. तर याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवरही बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी मंगळवारी एअरफोर्स स्टेशनचा दौरा केला आणि १७ गोल्डन एरो स्क्वॉड्रनची पुन्हा गठन केले. एअर चीफ मार्शल यांनी राफेलच्या स्वागताच्या तयारीचा आढावा देखील घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एलएसीवर तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन सीमेवर राफेल तैनात केले जाऊ शकते. राफेल विमानांच्या उड्डाणासाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारत सरकारने हवाई दलासाठी ३६ राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला होता.


भारत-ऑस्ट्रेलिया ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना रद्द होण्याची भीती!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -