राफेल विमानं केवळ ‘शो-पीस’ – प्रकाश आंबेडकर

'दाऊद इब्राहिमच्या कंपनीची विमानं ज्याप्रमाणे केवळ शो-पीस म्हणून विमानतळांवर उभी आहेत, तशीच अवस्था राफेल विमानांची होणार आहे', असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. 

Mumbai
Rafale is just show peace,says prakash ambedkar
आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ‘राफेल विमान’ घोटाळ्याचा मुद्दा वारंवार डोकं वर काढत आहे. याच मुद्द्यावर भारिपचं नेते प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच आपले मत मांडले. ‘भारतीय वायुसेनेला १२५ राफेल विमानांची गरज असताना केवळ ३६ विमानांचाच करार का झाला? याचे उत्तर सरकारने लवकरात लवकर द्यावे आणि राफेल विमानांच्या किंमतीबाबतही चर्चा केली जावी’, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. याशिवाय ‘राफेल विमानांची अवस्था ही दाऊद इब्राहिमच्या ‘, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. 

राफेल विमानं बिनकामी

प्रकाश आंबेडकर सोमवारी पालघर येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्य सत्ता संपादन महामेळाव्यात बोलत होते. पत्रकारांशी संवाद साधत असताना ते म्हणाले की, ‘भारत खरेदी करणार असलेली ३६ राफेल विमानं वापरण्याच्या स्थितीत असली पाहिजेत. ती सुस्थितीत आहेत का? त्यांची चाचणी झाली आहे का? याविषयीची खातरजमा करुन घेणं आवश्यक आहे.’ ‘मात्र, मोदी सरकार यासंदर्भात काहीच बोलायला तयार नाहीये, याचं आश्चर्य वाटतं’, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘राफेल विमानांची सद्यस्थिती ही माझ्या दृष्टीने बिनकामी आणि निकृष्ट दर्जाची आहे, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले.