घरदेश-विदेशरॅगिंगमुळे ५२ विद्यार्थ्यांना केलं निलंबित

रॅगिंगमुळे ५२ विद्यार्थ्यांना केलं निलंबित

Subscribe

मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगच्या प्रकारामुळे तब्बल ५२ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे घडली आहे.

मेडिकल कॉलेजमधील रॅगिंगच्या प्रकारामुळे तब्बल ५२ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे घडली आहे. सरसावामधील शेखुल हिंद मौलाना महमूद हसन मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी रॅगिंगचा प्रकार घडला होता. त्यासंबंधी कॉलेज प्रशासनाने बुधवारी आरोपी असलेल्या ५२ विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी निलंबित केले आहे. तसेच सहा महिन्यांकरता कॉलेजमधून काढून टाकले आहे. कॉलेज प्रशासनाने या कारवाईबाबतची माहिती महानिदेशक, सचिव, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांनी लावले गंभीर आरोप 

सरसावा येथील मेडिकल कॉलेजमधील २०१८ च्या बॅचमधील एमबीबीएसचे विद्यार्थी यांनी सीनियर विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याचा आरोप लावला आहे. याबाबत त्यांनी प्रा. डॉ. अरविंद त्रिवेदी यांच्याकडे तक्रार दाखल केली. पीडित विद्यार्थ्यांनी सीनियर विद्यार्थ्यांवर केस कापणे, कोंबडा बनवणे, अभ्यास न करू देणे, झोपू न देणे असे गंभीर आरोप केले आहेत. कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीने त्वरीत या प्रकाराची दखल घेत चौकशी सुरु केली. मंगळवारी उशिरा पोलिसातही तक्रार दाखल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -