‘राहुल राम तर प्रियांका दुर्गा माँ’; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली देवाची उपमा

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे काँग्रेस लावलेल्या पोस्टरवर राहुल गांधी यांना राम तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणच्या अवतारात दाखवण्यात आले होते. तर आता उत्तर प्रदेशमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टर्समधून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दुर्गा माँच्या अवतारात दाखवण्यात आले आहे.

Mumbai
rahul and priyanka
गांधीवर परिवारावर पोस्टरबाजी

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे काँग्रेस लावलेल्या पोस्टरवर राहुल गांधी यांना राम तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणच्या अवतारात दाखवण्यात आले होते. तर आता उत्तर प्रदेशमध्ये लावण्यात आलेल्या पोस्टर्समधून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दुर्गा माँच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. जसजसं निवडणुकीचं वातावरण तापत आहे, तसतसं राजकीय पक्षांकडून विरोधकांना डिवचण्यासाठीचे नवनवे प्रयोग होताना दिसत आहे. सध्या देशात राम मंदिरांचा मुद्दा सर्वत्र गाजत असताना. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी अध्यक्ष राहुल गांधींना राम तर प्रियांकाला दुर्गा माँ बनवून देवाची उपमा दिली आहे. हे पोस्टर्स शहरामध्ये जागोजागी लावण्यात आले आहेत.

वाघावर स्वार प्रियांका गांधी 

काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियांका गांधी या आज पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रियंका गांधी यांच्या या दौऱ्यामुळे उत्तर प्रदेशमधीलकाँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांच्या स्वागतासाठी ही पोस्टरबाजी केली आहे. लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेल्या एका पोस्टरमध्ये प्रियांका गांधी यांना वाघावर स्वार झालेल्या दुर्गेच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. माँ दुर्गेचे रूप असलेल्या भगिनी प्रियांका जी यांचे स्वागत, असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.

मोदींवरही पोस्टरबाजी 

दुसरीकडे आणखी एका पोस्टरमध्ये युवक काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर पांडेय यांनी एक बॅनर लावला असून त्यात भाजपा अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची छायाचित्रे आहेत. तसेच एक गट त्यांना सोडून जात असून हे तिघेही एकटे पडल्याचे त्यात दर्शवले आहे. पोस्टरवर ”ना बाबा ना, बहुत हो गया और अब लौं नसानि अब ना नसिहों” अशा वाक्यांचा उल्लेख करत मोदींची खिल्ली उडवण्यात आली आहे.

हेही वाचा –

मोदींना रावण तर राहुलला बनवले राम; काँग्रेसची पोस्टरबाजी

राहुल गांधींवरही बनतोय सिनेमा

जेव्हा राहुल गांधी हे मोदींच्या भाषणाची नक्कल करतात

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here