घरट्रेंडिंगमोदींनी अंबानींच्या खिशात ३० हजार कोटी टाकले - राहुल गांधी

मोदींनी अंबानींच्या खिशात ३० हजार कोटी टाकले – राहुल गांधी

Subscribe

राफेल विमान खरेदी प्रकरण हा खूप मोठा घोटाळा असलयाची महाचर्चा  गेल्या अनेक दिवसांपासून रंगते आहे. याच प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी ‘राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदींनी तब्बल ३० हजार कोटी रुपये, अनिल अंबानी यांच्या खिशात टाकले’ अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी केली आहे. याशिवाय ‘नरेंद्र मोदी हे उद्योगपती अनिल अंबानीचे चौकीदार आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान राफेल प्रकरणा पंतप्रधान मोदी तसंच अनिल अंबानी यांची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणीही राहुल गांधींनी यावेळी केली. गुरुवारी (आज) दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.


वाचा: राफेल कराराची माहिती द्या – सर्वोच्च न्यायालय

खास राफेल कराररासंदर्भात राहुल गांधी यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राफेल हा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा असल्याचं म्हणत राहुल यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र चालवले. पत्रकार परिषदेदरम्यान राहुल म्हणाले, की ‘नरेंद्र मोदी हे देशाचे नाहीत तर अनिल अंबानींचे यांचे पंतप्रधान आहेत. मोदी हे अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील तब्बल ३० हजार कोटी रुपये अंबानींच्या खिशात टाकले’. ‘अनिल अंबानी यांना विमान निर्मितीचा अनुभव नव्हता. राफेल कराराच्या काही दिवस आधीच त्यांनी कंपनीची स्थापना केली होती. अनिल अंबानी यांच्यावर हजारो कोटी रुपयांचे कर्ज आहे हे माहित असूनही, त्यांना राफेल डीलमध्ये स्थान देण्यात आले’, हा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान लवकरात लवकर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी’, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.


राफेल डिल: कुठंतरी पाणी मुरतंय – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -