घरदेश-विदेशराहुल आणि प्रियंका गांधींकडून पी. चिदंबरम यांची पाठराखण

राहुल आणि प्रियंका गांधींकडून पी. चिदंबरम यांची पाठराखण

Subscribe

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पी. चिदंबरम यांना पाठिंबा दर्शवला आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम अडचणीत आले आहेत. दिल्लीच्या हाय कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द केल्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. मात्र, पी. चिदंबरम बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पी. चिदंबरम यांची पाठराखण केले आहे. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी ट्विटरवर यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

चिदंबरम यांच्या बाजून उभे आहोत – प्रियंका गांधी

‘चिदंबरम हे विद्यवान आणि आदरणीय असे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांनी काही दशके अर्थमंत्री आणि गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळून देशाची नैतिकता जपली आहे. ते निर्भयपणे खरे बोलतात आणि सरकारच्या अपयशावर उघडपणे बोलतात. परंतु, या सरकारने त्यांना अत्यंत वाईट आणि लाजिरवाणेपणे कोंडीच पकडत आहे. आम्ही त्यांच्या बाजून उभे आहोत. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता आम्ही यासाठी लढू’, असे प्रियंका गांधी ट्विटरवर म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – पी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच; कधीही होऊ शकते अटक  

राहुल गांधींकडून सरकारचा निषेध

राहुल गांधी यांनी पी. चिदंबरम यांना पाठिंबा दर्शवला आहे. मोदी सरकार ईडी, सीबीआय या स्वायत्त संस्थांना हाताशी घेऊन पी. चिदंबरम यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहे. सत्तेचा अशा प्रकारे वापर करणाऱ्या सरकारचा मी निषेध करतो, असे राहुल गांधी म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -