घरदेश-विदेशराहुल गांधींनी देशाची माफी मागा - रावसाहेब दानवे

राहुल गांधींनी देशाची माफी मागा – रावसाहेब दानवे

Subscribe

आपल्या राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करून देशाची दिशाभूल केल्याबद्दल  आणि देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागणे आवश्यक असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे यांनी म्हटले आहे.

राफेल लढाऊविमानांच्या व्यवहाराबद्दलसर्वोच्च न्यायालयानेशुक्रवारी दिलेल्यानिकालामुळे सत्याचा विजय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्रमोदी यांच्यावर राजकीयफायद्यासाठी खोटे आरोपकरून देशाची सुरक्षितताधोक्यात आणणाऱ्या काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची,देशातील जनतेची आणि सैनिकांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे यांनी शुक्रवारी केली.

काय म्हणाले दानवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेभ्रष्टाचारमुक्त आणि  पारदर्शी प्रशासन दिले आहे या सराकाला भ्रष्टाचाराचा डाग लागवण्याच्या उद्देशाने खोटो आरोप केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात यासर्व आरोपांची उत्तरे मिळाली असून सत्याचा विजय झाला आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी खोटे आरोप करून देशाची दिशाभूल केल्याबद्दल  आणि देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागणे आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधींकडे पुरावेच नाहीत

राहुल गांधी यांच्याकडे राफेलबाबत पुरावे होते तर त्यांनी ते सर्वोच्च न्यायायात मांडावे. मात्र त्यांनी तसे केले नाही कारण त्यांच्याकडे पुरावेच नाहीत. केवळ सत्ताधारी पक्षाला बदनाम करण्यासाठी हे खोटे आरोप केले जात आहे. असे आरोप करताना आपण देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतो आहोत आणि सैनिकांचे मनोधैर्य खच्चीकरण करत आहोत. याचेही भान राहुल गांधींनी ठेवले नाही. आता हिंमत असेल तर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने संसदेत या विषयावर चर्चा करावी असे आव्हान त्यांनी केले.

न्यायालयाच्या निर्णयाचे केंद्रियमंत्र्यांनी केले स्वागत

राफेल करार प्रकरणी करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना क्लिन चिट दिली आहे. केंद्रसरकरविरुद्ध राफेल कारारावरून आरोपांचे कितीही वाकयुद्ध काँग्रेसने संसदेत छेडले होते तरी अंतिम विजय हा सत्याचाच असतो याची प्रचिती आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अली असल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे.

- Advertisement -

काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस ने राफेल बाबत केंद्र सरकारवर खोटे आरोप करीत धुरळा उडविला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने आरोपांची ही धूळ खाली बसली असून सत्य समोर आले आहे.नरेंद्र मोदींचे सरकार भ्रष्टाचार विरहित निष्कलंक असून आगामी काळात लोकसभा निवडणुकांत काँग्रेस च्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही. भ्रष्टाचाराचा एकही डाग नसलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर जनतेचा आजही विश्वास असल्याचे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -