घरदेश-विदेशदोषी नसतील, तर मोदींनी स्वत:च चौकशीसाठी पुढे यावं - राहुल गांधी

दोषी नसतील, तर मोदींनी स्वत:च चौकशीसाठी पुढे यावं – राहुल गांधी

Subscribe

राहुल गांधींनी राफेल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता नवं आव्हान दिलं आहे.

राफेल विमान करारातील कथित घोटाळ्याचं भूत भाजप सरकारच्या मानगुटावर बसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे, यावेळी चर्चेचं आमंत्रण न देता राहुल गांधींनी मोदींना स्वत:हूनच चौकशीसाठी समोर येण्याचं थेट आवाहन आणि अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अजूनपर्यंत भारतीय जमिनीवर न उडालेल्या राफेल विमानाच्या करारातील घोटाळ्याचा धुरळा मात्र जोरदार उडणार असल्याचं दिसून येत आहे.

वायुसेनेची टीम वाटाघाटी करत असताना मोदींना स्वतंत्रपणे वाटाघाटी करण्याची काय गरज होती? अनिल अंबानीला ३० हजार कोटी देण्यासाठीच मोदींनी राफेल विमानं भारतात येण्यासाठी विलंब केला. त्यात त्यांचा देखील फायदा होताच.

राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

राहुल गांधींनी दिला होता पुरावा

याआधी राफेल घोटाळ्यासंदर्भातील वायुसेनेच्या अधिकाऱ्यांची कागदपत्र दाखवत राहुल गांधींनी करारातल्या मोदींच्या सहभागाचे पुरावे दिले होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल करारामध्ये वाटाघाटी करणाऱ्या टीमसोबतच स्वतंत्रपणे स्वत:च्या माध्यमातून देखील वाटाघाटी करत होते’, असा स्पष्ट उल्लेख या कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे. त्यावरूनच आता राहुल गांधींनी भाजप आणि विशेषत: नरेंद्र मोदींना हैराण करायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

‘चोरी झालेल्या फायलींमध्ये नक्कीच काळंबेरं!’

‘राफेलच्या करारासंदर्भातल्या महत्त्वाच्या फायली चोरी होतात म्हणजे या फायलींमध्ये काहीतरी काळंबेरं नक्कीच असणार’, असा थेट दावा यावेळी राहुल गांधींनी केला. तसेच, ‘जर राफेलमध्ये काहीही घोटाळा झाला नाही, असं पंतप्रधान म्हणत असतील, तर त्यांनी स्वत:हून चौकशीसाठी पुढे यावं’, असंदेखील राहुल गांधी यावेळी म्हणाले आहेत.


वाचा काय म्हणणं आहे रिलायन्सचं – रिलायन्स डिफेन्सचे राहुल गांधींना प्रत्युत्तर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -