घरट्रेंडिंगकाँग्रेसच्या 'गांधीजीं'मध्ये, भाजपने शोधले 'सावरकर'

काँग्रेसच्या ‘गांधीजीं’मध्ये, भाजपने शोधले ‘सावरकर’

Subscribe

'राहुल गांधी आधी सावकरकरांवर प्रहार करतात आणि मग त्यांचाच फोटो गांधीच्या फोटोमध्ये वापरत ट्वीट करतात' - अमित मालवीय

नुकतीच देशभरात महात्मा गांधीची १५०वी जयंती साजरी करण्यात आली. राजकीय वर्तुळातील अनेक मोठ्या नेत्यांनी प्रत्यक्षात तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्वीवटरच्या माध्यमातून गांधीजींचा एक फोटो शेअर करत त्यांना अभिवादन केले. मात्र, सध्या याच ट्वीटरची आणि ट्वीटरमधील गांधींच्या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते आहे. राहुल यांनी शेअर केलेल्या गांधीजींच्या या चित्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो शोधल्याचा दावा भाजपने केला आहे. राहुल गांधींनी ट्वीटरवर शेअर केलेल्या गांधीजींच्या चित्रामध्ये देशातील अनेक नावाजलेल्या व्यक्तींना दाखवण्यात आले आहे. या सर्व नेत्यांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरही असल्याचा दावा भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, ‘हा नुसता गांधींचा फोटो नाही तर भारतातील विचार आहेत. जे विचार संपूर्ण भारतात वाहत आहेत. महात्मा गांधी जगले सत्य आणि अहिंसेसाठी जो आमच्या भारताचा पाया आहे.


वाचा: पंतप्रधान मोदींना एक विशेष पुरस्कार!

भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींच्या या ट्वीटला रिप्लाय करत, गांधीजींच्या फोटोत स्वातंत्र्यवीर सावरकर असल्याचा दावा केला आहे. याच मुद्द्यावरुन अमित मालवीयांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘राहुल गांधी आधी सावकरकरांवर, त्यांच्या विचारांवर प्रहार करतात आणि मग त्यांचाच फोटो गांधीच्या फोटोमध्ये वापरत ट्वीट करतात’, अशाप्रकाची कमेंट करत अमित यांनी ट्वीट केले आहे. सध्या सोशल मीडियावर हे ट्वीटवॉर चांगलंच रंगतं आहे.

- Advertisement -
 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -