घरदेश-विदेश'आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये संचार करण्याचे स्वातंत्र्य द्या'

‘आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये संचार करण्याचे स्वातंत्र्य द्या’

Subscribe

'आम्हाला जम्मू-काश्मीरमध्ये मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य द्या', असे राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना म्हणाले आहेत.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काँग्रसचे नेते राहुल गांधींना जम्मू-काश्मीरची सध्य परिस्थिती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा सल्ला दिला होता. याशिवाय जम्मू-काश्मीरला भेट देण्यासाठी आम्ही विमानाची देखील व्यवस्था करतो, असेही म्हटले होते. यावर आता राहुल गांधी यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरची सध्य परिस्थिती पाहण्यासाठी आम्हाला विमान नको. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये खुल्याने फिरण्याचे स्वातंत्र्य द्या, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – ‘राहुल गांधी, आधी जम्मू-काश्मीरची परिस्थिती पाहा मग बोला’

- Advertisement -

नेमके काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले, ‘प्रिय राज्यपाल मलिक साहेब, आम्ही आपल्या निमंत्रणाचा मान ठेवून जम्मू-काश्मीरचा दौरा करणार आहोत. आमल्या निमंत्रणाबद्दल आभारी आहोत. विरोध पक्षनेते आणि मी लवकरच काश्मीर दौरा करणार आहोत. त्याचबरोबर या दौऱ्यासाठी आम्हाला आपल्या विमानाची आवशकता नाही. फक्त आम्हाला काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या लोकांशी मोकळेपणाने बोलण्याचे स्वातंत्र्या द्या. तिथल्या आघाडीच्या नेत्यांशी बोलण्याचे स्वातंत्र्य द्या.’ राहुल गांधीच्या या ट्विटवर आता राज्यपाल काय प्रतिक्रिया देतील? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -