घरदेश-विदेशमोदींना हिंदुत्वाबद्दल काहीच माहित नाही - राहुल गांधी

मोदींना हिंदुत्वाबद्दल काहीच माहित नाही – राहुल गांधी

Subscribe

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान हिंदू असले तरी त्यांना हिंदूत्वाबद्दल काहीच माहित नाही. मोदी नेमके कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत? असा सवालही त्यांनी केला आहे. शिवाय, गीतेत काय लिहिलय ते सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र मोदींना हिंदूत्वाबद्दल काहीच ठाऊक नाही, असे गांधी म्हणाले आहेत.

निवडणूक जवळ आली की प्रचारसभांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणे हे कॉंग्रेस आणि भाजपचे नित्यनेमाचे झाले आहे. येत्या ७ डिसेंबरला राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक असणार आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी राजस्थानमध्ये उदयपूरला आले होते. यावेळी त्यांनी व्यापारी वर्गाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान हिंदू असले तरी त्यांना हिंदूत्वाबद्दल काहीच माहित नाही. मोदी नेमके कुठल्या प्रकारचे हिंदू आहेत? असा सवालही त्यांनी केला आहे. शिवाय, गीतेत काय लिहिलय ते सगळ्यांना ठाऊक आहे. मात्र मोदींना हिंदूत्वाबद्दल काहीच ठाऊक नाही, असे गांधी म्हणाले आहेत.

हेही वाचा – देश घडवणाऱ्यांचा मोदींनी अपमान केला – राहुल गांधी

- Advertisement -

‘मोदींनी राजकीय फायदा घेतला’

राहुल गांधी म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळातही तीन वेळा सर्जिकल स्ट्राइक झाले होते. परंतु, सैन्य अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगण्याची विनंती केल्यामुळे याविषयी जगाला माहिती झाली नाही. परंतु, सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या क्षेत्रात प्रवेश केला. सैन्यांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा मोदी यांनी फक्त राजकीय फायदा घेतला आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी मोदींवर केला आहे. त्याचबरोर राहुल गांधी यांनी सांगितले की, खासगी शिक्षण संस्था या चांगल्या असतात असा लोकांमध्ये गैरसमज असतो. शिवाय, सरकारच्या मदतीशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात पुढे जाता येणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी गांधी यांनी पुन्हा नोटबंदीचा विषय काढला. नोटबंदीच्या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर नोटबंधीमुळे दोन लाख लोक उद्धवस्त झाले आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले.


हेही वाचा – राहुल गांधींनी बैल तरी जुंपले आहेत का? – अमित शहा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -