घरदेश-विदेश'चौकीदार चोर है' या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी मागितली माफी

‘चौकीदार चोर है’ या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी मागितली माफी

Subscribe

चौकीदार चोर है, ही घोषणा देऊन देशभरात खळबळ माजवणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टात माफी मागितली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करणाऱ्या भाषणादरम्यान ओघात आपण चौकीदार चोर है असे म्हणालो, असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिले आहे.

भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. राफेलचे कागदपत्रे गहाळ झाल्यानंतर त्याची चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानंतर “आता सुप्रीम कोर्ट देखील ‘चौकीदार चोर है’ असे म्हणत आहे”, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. या वक्तव्यावर आक्षेप घेत लेखी यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने २२ एप्रिलपर्यंत राहुल गांधी यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. आज राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त केली.

- Advertisement -

माझ्या वक्तव्याचा विरोधकांनी चुकीचा अर्थ काढला असल्याचे राहुल गांधी यावेळी म्हणाले. मी ते वक्तव्य राजकीय प्रचाराच्या ओघात केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -