‘ट्रम्प यांच्यासोबत काय बोलणं झालेलं ते मोदींनी स्पष्ट करावं’

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरुन राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी मोदींना 'ट्रम्प यांच्यासोबत काय बोलणं झालेलं ते मोदींनीं स्पष्ट करावं', असे म्हटलं आहे.

New Delhi
modi and rahul gandhi
राहुल गांधींची मोदींवर टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्यासाठी नरेंद्र मोदींनी आपल्याला विनंती केल्याचा दावा केल्याचे म्हटले होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा भारतीय पररारष्ट्र मंत्रालयाने खंडन केले आहे. मोदींनी अशी कुठल्याही प्रकारची विनंती अमेरिकेला केली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवकते रवीश कुमार यांनी स्पष्टक केले. परंतु, मंगळवारी राज्यसभेत हा मुद्दा प्रचंड गाजला. विरोधकांनी राज्यसभेत हा मुद्दा लावून धरला आणि त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींना ट्रम्प यांच्यासोबत नेमकं काय बोलणं झालेलं ते स्पष्ट करावं, असे आवाहन केले आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधींनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मोदींना ट्रम्प सोबत काय बोलणं झालं होतं ते स्पष्ट करण्याचं म्हटलं आहे. ‘डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीर मुद्द्यावर आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. जर हे खरं असेल तर मोदींनी १९७२ च्या शिमला करार आणि भारताच्या हिताला साजेशं असं केलेलं नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्यासोबत काय बोलणं झालं होतं ते पंतप्रधानांनी देशातील नागरिकांना सांगायला हवं’, असं राहुल गांधी म्हणाले.


हेही वाचा – काश्मीर प्रश्नावरील ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here