घरताज्या घडामोडीराहुल गांधींनी राम मंदिर भूमिपूजनानंतर केलं 'हे' ट्विट म्हणाले...

राहुल गांधींनी राम मंदिर भूमिपूजनानंतर केलं ‘हे’ ट्विट म्हणाले…

Subscribe

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्यामध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या शिलान्यासाचे उद्घाटन देखील करण्यात आले. यानिमित्ताने अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून प्रभुरामचंद्रांच्या गुणांचं वर्णन केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम सर्वोच्च मानवी गुणांचे स्वरुप आहे. आपल्या मनाच्या खोलवर राम मानवतेचे मूळ आहे.
राम प्रेम आहे. ते कधी द्वेषामधून प्रकट होऊ शकत नाही.
राम करुणा आहे. ते कधी क्रूरपणे प्रकट होऊ शकत नाही.
राम न्याय आहे. ते कधी अन्यायामधून प्रकट होऊ शकत नाही.’

- Advertisement -

अयोध्यतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. पंतप्रधान मोदींची अयोध्येत उत्तरचे प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केले. त्यानंतर मोदींनी गढी मंदिरात पूजा केली आणि या ठिकाणी वृक्षारोपणही केले. मग मंत्रोच्चाराच्या गजारात मोदींच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला.

- Advertisement -

हेही वाचा – Ayoddhya Ram Mandir : हे सारं न भूतो, न भविष्यती आहे – नरेंद्र मोदी


 

एक प्रतिक्रिया

  1. It is tragedy and immaturity,non-sense attitude and philosophy of leaders of defunct congress party that they have realized, come to know about Lord Ram after so many years passed.It is better now to handover this party to young,pragmatic leader exist in party so that their existence will be protected .

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -