घरदेश-विदेशव्यवसाय ट्रॅकवर कसा आणायचा? राहुल गांधी राजीव बजाज यांच्याशी आज चर्चा करणार

व्यवसाय ट्रॅकवर कसा आणायचा? राहुल गांधी राजीव बजाज यांच्याशी आज चर्चा करणार

Subscribe

राहुल गांधी आज बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी चर्चा करणार आहेत.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विरोधक सातत्याने अर्थव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारला घेराव घालत आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी तज्ञांशीही अर्थव्यवस्थेबाबत चर्चा करत आहेत. तज्ज्ञांशी चर्चा करण्याच्या या मालिकेत राहुल गांधी आज बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी चर्चा करणार आहेत.

राहुल गांधी आणि राजीव बजाज यांच्या चर्चेला गुरुवारी सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. राहुल गांधी कोरोना विषाणू संकट, अर्थव्यवस्थेवरील परिणाम, लॉकडाऊनमुळे पुरवठा साखळीवरील ब्रेक आणि अनलॉकिंग प्रक्रिया या विषयांवर चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी तज्ञांशी सतत बोलत असतात. राहुल गांधींनी सुरुवातीला रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली, त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशीही चर्चा झाली. याशिवाय राहुल गांधी यांनी हार्वर्डच्या प्राध्यापकाशी स्थलांतरित कामगारांविषयी चर्चा केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राजभवनावर ‘चक्रम वादळे’ आदळतात, राज्यपालांनी सावध रहायला हवं – सामना


देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे उद्योगधंदे बंद पडले. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला. अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. दरम्यान, मुडीज या रेटिंग एजन्सीने भारताचं रेटिंग कमी केलं आहे. याचा परिणाम भारताच्या गुंतवणुकीवर होणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -