घरदेश-विदेश८ महिन्यांत ६ हजार रेल्वे स्थानकं येणार ऑनलाईन!

८ महिन्यांत ६ हजार रेल्वे स्थानकं येणार ऑनलाईन!

Subscribe

देशभरातील ६ हजार रेल्वेस्थानकं येत्या ६ ते ८ महिन्यांमध्ये वायफाय कनेक्ट करण्याचा विश्वास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बोलून दाखवला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अण्ड इंडस्ट्री अर्थात फिक्कीने आयोजित केलेल्या ‘स्मार्ट रेल्वेज कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते.

हल्ली ऑनलाईनचा जमाना आहे हे वाक्य आपण नेहमीच ऐकतो. सर्वच गोष्टी अवघ्या एका क्लिकवर उपलब्ध झालेल्या आहेत. आणि त्यात भारतीय रेल्वे विभागही मागे राहिलेला नाही. देशभरातली तब्बल ६००० रेल्वे स्थानकं वायफायने जोडण्याचा निर्धार रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी बोलून दाखवला आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अण्ड इंडस्ट्री अर्थात फिक्कीने आयोजित केलेल्या ‘स्मार्ट रेल्वेज कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते. येत्या ६ ते ८ महिन्यांमध्ये देशभरातली ६००० रेल्वे स्थानकं वायफायने जोडली जातील असं ते म्हणाले.

दुर्गम भाग ‘ऑनलाईन’ करण्याचं आव्हान!

देशभरातील रेल्वेचं जाळं कसं सुधारता येईल? आणि रेल्वेकडून अत्याधुनिक सुविधा कशा उपस्थित करून देता येतील? याविषयी चर्चा करण्यासाठी या कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना हे मोठं आव्हान रेल्वे यशस्वी करून दाखवेल असा विश्वास यावेळी पियुष गोयल यांनी व्यक्त केला. दरम्यान, ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल, तर भारताच्या दुर्गम भागापर्यंत ते पोहोचवण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करावे लागतील’, असंही ते म्हणाले.

जिथे फायबर ऑप्टिक पोहोचलेले नाही, तिथपर्यंत ऑनलाईन कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी रेल्वे काम करत आहे. त्यामुळे येत्या ६ ते ८ महिन्यांमध्ये देशभरातील ६००० प्रमुख रेल्वे स्थानकांवर वायफाय कार्यरत असेल. स्मार्ट प्रोजेक्ट्सची अंमलबजावणी करण्यावर आता भर द्यावा लागेल.

पियुष गोयल, रेल्वेमंत्री

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – रेल्वे प्रवाशांची चिधींगिरी; टॉयलेटमधले नळ चोरले


विमानाप्रमाणेच रेल्वेतही मिळणार सुविधा!

दरम्यान, आता विमानातील स्टाफप्रमाणेच रेल्वेतील स्टाफही जेवणानंतरचा कचरा गोळा करण्यासाठी ट्रॅश बॅग सोबत ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. रेल्वेच्या प्रवाशांना विमानसेवेप्रमाणेच सेवा मिळावी यासाठी जेवणापासून ते व्हॅक्युम टॉयलेटपर्यंतच्या सुविधांचा फायदा होईल असाही विश्वास रेल्वेतील उच्चाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -