घरदेश-विदेशसणासुदीत हंगामात ३० रेल्वे रद्द; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

सणासुदीत हंगामात ३० रेल्वे रद्द; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Subscribe

दुहेरी रेल्वे रुळाचे काम पुर्ण होताच या बंद करण्यात आलेल्या रेल्वे पुन्हा सुरू

दिवाळी तोंडावर आलेली असताना तसेच सणासुदीत हंगामात रेल्वे प्रशासनाकडून तब्बल ३० एक्सप्रेस रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत रेल्वे बंद असल्याने याचा फटका रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

सण-उत्सवाच्या निमित्ताने अनेक प्रवासी रेल्वे वाहतूकीने प्रवास करणं अधिक पसंत करतात. सणासुदीच्या काळात अनेक लोकं शहरांकडून गावाला सण साजरा करण्यासाठी जात असतात. याकरिता आगाऊ रेल्वे तिकीट देखील आरक्षित केले जाते. मात्र, यंदा प्रवाशांची या काही एक्सप्रेस बंद असल्याने पंचाईत होणार आहे.

- Advertisement -

यासाठी रेल्वे रद्द करण्याचा प्रशासनाचा निर्णय

प्रशासनाने दुहेरी रेल्वे रुळाचे काम लवकर व्हावे यासाठी रेल्वे रद्द करण्यात आलेल्या मार्गावर चालवण्यात येणाऱ्या रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हरिद्वार आणि लक्सर रेल्वे रूळावर काम सुरू असल्याने रेल्वेने ३० रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला असण्याचे सांगण्यात येत आहे. याकारणास्तव १३ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये २५ ते ३० रेल्वे बंद असणार आहे. काम पुर्ण होताच या बंद करण्यात आलेल्या रेल्वे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

१३ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर दरम्यान या रेल्वे असणार बंद 

मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या कालावधीमध्ये २५ ते ३० रेल्वे बंद असणार आहे. काम पुर्ण होताच या बंद करण्यात आलेल्या रेल्वे पुन्हा सुरू करण्यात येतील

  • अमृतसर हरिद्वार एक्स्प्रेस (१३ ते २२ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • बिकानेर हरिद्वार (१४ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत बंद)
  • अंबाला छावनी ते ऋषिकेश डेली (१६ ते २१ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • जम्मू ते हरिद्वार (१३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • ऋषिकेश ते अंबाला छावनी डेली (१३ ते २२ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • हरिद्वार ते जम्मू (१४ ते १९ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • देहरादून ते अमृतसर डेली (१७ ते २२ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • देहरादून वांद्रे डेली (१७ ते २३ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • ऋषिकेश ते कटरा डेली (१७ ते २२ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • देहरादून, उज्जैन (१५ ते १६ ऑक्टोबरपर्यंत बंद)
  • देहरादून इंदूर (१७ ते १८ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • देहरादून न्यू दिल्ली डेली (१३ ते २२ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • देहरादून सहारनपूर डेली (१३ ते २२ ऑक्टोबर पर्यंत रद्द)
  • अमृतसर ते देहरादून डेली (१६ ते २१ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • वांद्रे देहरादून डेली (१५ ते २१ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • कटरा ऋषिकेश डेली (१६ ते २१ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • उज्जैन देहरादून (१६ आणि १७ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • न्यू दिल्ली ते देहरादून डेली (१३ ते २२ ऑक्टोबरपर्यंत बंद)
  • इंदूर देहरादून (१९ ते २० ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • सहारनपूर देहरादून डेली (१३ ते २२ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • हरिद्वार ते अमृतसर एक्स्प्रेस (१३ ते २२ ऑक्टोबर पर्यंत बंद)
  • हरिद्वार ते बिकानेर (१५ ते २२ ऑक्टोबर पर्यंत बंद)

‘या’ एक्सप्रेस १० दिवसांसाठी राहणार बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -