घरदेश-विदेशरेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात!!

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात!!

Subscribe

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं जोरात आहे. कारण रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस दिला जाणार आहे.

दिवाळी की दिवाळं? असा सर्वसामान्यांचा प्रश्न असतो. कारण दिवाळी जवळ आली की सर्वकाही खर्चाची कामं. खरेदी, फराळ या साऱ्या गोष्टी मग आल्याच. त्यात पैसे कमी पडले तर मग होणारी चिडचिड सर्वांना माहित आहे. त्यामुळं सर्वांची नजर असते मिळणाऱ्या बोनसकडे. कंपनी किती बोनस देणार याची चर्चा दिवाळीच्या तोंडावर रंगते. त्यात जर मनाप्रमाणे बोनस न मिळाल्यास हिरमोड हा ठरलेला. पण यावर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र जोरात, दणक्यात आणि होऊ दे खर्च अशीच असणार आहे. कारण रेल्वे कर्मचाऱ्यांना तब्बल ७८ दिवसांचा बोनस दिवाळीच्या तोंडावर मिळणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं या कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करता येणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या बेसिक पगारावरून हा बोनस दिला जाणार आहे.

दिवाळीची लगबग

६ नोव्हेबरपासून दिवाळीची सुरूवात होणार आहे. त्यामळे सध्या बाजारपेठा देखील सजल्या आहेत. ग्राहकांची देखील आता खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये नेमकं काय करायचं याची तयारी देखील सुरू झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -