घरदेश-विदेशमहिन्यातून दोनदा धुतले जाणार एसी कोचमधील ब्लँकेट

महिन्यातून दोनदा धुतले जाणार एसी कोचमधील ब्लँकेट

Subscribe

नव्या सुविधेतंर्गत एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता महिन्यातून दोन वेळा धुतलेले ब्लँकेट्स मिळणार आहेत. यासाठी आता वॉशेबल ब्लँकेट्स आणण्यात येणार असून हे सहज धुता येतील.

तुम्ही जर नेहमी रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करत असाल तर, तुमच्यासाठी एक खुषखबर आहे. आता रेल्वेमध्ये मिळणारे ब्लँकेट्स महिन्यातून दोन वेळा रेल्वेतर्फे धुण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वे सतत आपल्या प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या बऱ्याच दिवसांत विविध सुविधांमध्ये भारतीय रेल्वेनं बदल केले आहेत. २०१७ मधील कॅग अहवालानुसार, रेल्वेमध्ये असणाऱ्या कमतरतांबद्दल इशारा देण्यात आला होता. त्यानंतरच रेल्वेनं आपल्या सुविधांमध्ये बरेच बदल केले आहेत. या अहवालानुसार, हीन दर्जाची ब्लँकेट्स रेल्वेत मिळत असून अतिशय खराब असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर ही ब्लँकेट्स वापरावी असं वाटणारही नाही असंही नमूद करण्यात आलं होतं.

सहा महिन्यात धुतले नाहीत ब्लँकेट्स

कॅगच्या अहवालानुसार, बऱ्याच रेल्वे मंडळामध्ये ब्लँकेट्स सहा महिन्यांपासून न धुतल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळं या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी नव्या सुविधेतंर्गत एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता महिन्यातून दोन वेळा धुतलेले ब्लँकेट्स मिळणार आहेत. यासाठी आता वॉशेबल ब्लँकेट्स आणण्यात येणार असून हे सहज धुता येतील.

- Advertisement -

महिन्यातून दोनदा धुण्याचा नियम

सध्या तरी रेल्वेत मिळणारे ब्लँकेट्स महिन्यातून दोन वेळा धुण्याचा नियम करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये आता जुने ब्लँकेट्सदेखील प्रवाशांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय ब्लँकेट्स खराब झाल्याची तक्रारींमुळं हैराण झालेल्या रेल्वेनं आता ब्लँकेट्स हळूहळू बदलण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंडळाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार, एसी कोचमध्ये चांगल्या दर्जाचे नायलॉन ब्लँकेट्स आता देण्यात येतील. सध्या निवडण्यात आलेले ब्लँकेट्स हे २.२ किलो वजनाचे असून लहान आकाराचे आहेत आणि याचा वापर चार वर्षे करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -