अनोखी संक्रांत, राजस्थानमध्ये उडणार ‘राफेल पतंग’

राजस्थान काँग्रेसने राफेलवरील प्रश्न पतंगावर छापून त्याचे लोकांमध्ये वाटप करत पुन्हा एकदा भाजपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Rajasthan
Rajasthan congress criticises modi on rafale deal
राफेलवरील प्रश्न छापलेले पतंग

राफेल करारावरून सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. राफेलमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. संसदेतील ही लढाई आता जाहीर सभांमध्ये देखील पाहायाला मिळत आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी यांना राफेल मुद्द्यावरुन काही प्रश्न केले होते. मात्र त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्तरे मिळालेली नसल्याने आता काँग्रेसने पतंगांवर ते प्रश्न छापले आहेत. राजस्थान काँग्रेसने राफेलवरील प्रश्न छापलेले पतंग लोकांमध्ये वाटले आहेत. राज्यातील प्रत्येक भागात या पतंगाच वाटप केले जात असून त्याद्वारे पुन्हा एकदा काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अनिल अंबानी यांना देखील कंत्राट मिळाल्यावरून काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना केले हे प्रश्न

  • हवाई दलास १२६ राफेल विमानांची गरज असताना ३६ विमाने कशासाठी?
  • राफेलच्या विमानाची किंमत ५६० कोटी असताना १६०० कोटींची गरज कशासाठी?
  • ‘एचएएल’ ऐवजी अनिल अंबानी यांची कंपनी का?
  • तसेच पर्रीकरजी यांनी राफेलच्या फायजी बेडरुममध्ये का ठेवल्या आहेत आणि त्यात काय आहे?राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत टिका केली होती. हिम्मत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्याशी १५ मिनिटं चर्चा करावी आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं राहुल गांधी यांनी म्हटलं होत. लोकसभेमध्ये जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींनी राफेल करारावरील चर्चेचं खुलं आव्हान दिलं. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत राफेल कराराबाबत सरकारची बाजु मांडली. पण, मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर सीतारमण यांना देता आलं नाही. म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला आहे.

    वाचा – “काँग्रेसला भ्रष्टाचारासाठीच कमकुवत सरकार पाहिजे”


     

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here