घरदेश-विदेशRajasthan Election 2018 - राज्यात काँग्रेस विजयी

Rajasthan Election 2018 – राज्यात काँग्रेस विजयी

Subscribe

राजस्थानमध्ये भाजपला मागे सोडत काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. काँग्रेसच्या विजयानंतर मुख्ममंत्री वसुंधरा राजे यांनी राजीनामा दिला आहे.

राजस्थानमध्ये २०० जागांसाठी मतमोजणी अखेर रात्री उशीरा संपली. राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती. मात्र काँग्रेस ही दिवसभरात आघाडीवर होती. मात्र सत्ता स्थापनेला १०१ हा बहुमताचा आकडा गाठावा लागणार आहे. अखेरपर्यंत काँग्रेस ही ९९ जांगावर विजयी झाली होती. त्यामुळे काँग्रेस आघाडीवर असली तरीही सत्ता स्थापनेसाठी फार कमी जांगाचे अंतर होते. निवडणुकीत भाजपला ७३ जागा मिळवल्या. दोन राजकीय पक्षांव्यतिरिक्त बहुजन समाज पार्टी, नॅशनल पीपल पार्टी या पक्षांच्या कामगिरीकडे देखील आपापल्या पद्धतीने प्रयत्न केला. २०१३ साली राजस्थानमध्ये भाजपनं १६० जागांसह सत्ता स्थापन केली होती. पण, यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप सत्ता कायम राखण्यास अपयशी ठरले आहे.

राजस्थानमध्ये या पक्षांनी मिळवल्या जागा

बहुजन समाज पार्टी – ६ जागा

- Advertisement -

भाजपा – ७३ जागा

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – २ जागा

- Advertisement -

इंडियन नॅशनल काँग्रेस – ९९ जागा

भारतीय आदिवासी पार्टी – २ जागा

राष्ट्रीय लोकदल – १ जागा

राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष – ३ जागा

स्वतंत्र – १२ जागा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -