Video: वाहनांनी नाही तर मोरांमुळे झालं रस्त्यात ट्राफिक जाम… तुम्हीच बघा!

सोशल मीडियावर ट्रॅफिक जामचा हा व्हिडीओ होतोय चांगलाच व्हायरल

Rajasthan
प्रातिनिधीक फोटो

कोरोना व्हायरसमुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू राहणार असला तरी या काळात सरकारने लोकांना थोडा दिलासा दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ट्रॅफिक जामचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र ही ट्राफिक कोणत्याही वाहनांची नाही तर आपल्या राष्ट्रीय पक्षी मोराची आहे. ही अतिशयोक्ती नाही तर हे खरंच आहे….

बन अधिकारी प्रवीण यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बऱ्याच मोरांची गर्दी बघायला मिळत आहे. या मोरांनी केलेल्या ट्राफिक जाममुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसतेय.

तसेच या व्हिडीओमध्ये असे दिसते की, समोरून गाडी आल्याचे दिसताच हे अनेक मोर रस्ता मोकळा करण्यास सुरूवात करतात. त्याचवेळी, एक मोर पंखांचा पिसारा फुलवून नाचताना दिसतोय. नेटकरी या व्हिडीओला सोशल मीडियावर पसंती देताना दिसताय. व्हिडीओ शेअर करताना प्रवीण कसवान यांनी लिहिले की, ‘राष्ट्रीय पक्ष्यांनी केले चक्क ट्राफिक जाम’. हा व्हिडीओ राजस्थान येथील असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

प्रवीण कसवान यांनी हा व्हिडीओ १७ मे रोजी शेअर केला असून आतापर्यंत त्याला १.३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ११ हजाराहून अधिक लाईक्स आणि २ हजार री-ट्वीट झाले आहेत. नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया…

 


Video: हजाराची पैज जिंकण्यासाठी माकडाला धरले वेठीस; चक्क माकडाची केली दाढी!