घरदेश-विदेशपोलीस कॉन्स्टेबलने केला विवाहित महिलेवर बलात्कार; व्हिडीओ बनवून करत होता ब्लॅकमेल

पोलीस कॉन्स्टेबलने केला विवाहित महिलेवर बलात्कार; व्हिडीओ बनवून करत होता ब्लॅकमेल

Subscribe

राजस्थानमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने ३२ वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये आरोपीने सहकाऱ्यांनाही यात सामील केलं. त्याने या बलात्काराचे अनेक व्हिडीओ बनवले होते. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ​​असे. ३ महिन्यांच्या छळानंतर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला मारहाण करत हाकलवण्यात आलं. शेवटी एसपीकडे विनवणी केली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ही खळबळजनक घटना राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील आहे.

संजय कुमार (वय २८) असं आरोपी पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक तेजस्वाणी गौतम यांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या महिलेवर झालेल्या बलात्काराचा तपास राजगड पोलिस अधिकाऱ्यावर सोपविण्यात आला आहे. राणी पोलीस ठाण्यात तैनात कॉन्स्टेबल संजय कुमारने एका विवाहित महिलेला धमकावून शारीरिक शोषण केलं. या प्रकरणाची माहिती महिलेच्या नवऱ्याला मिळाल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली, परंतु बरेच दिवस राणी पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. दरम्यान, आता तक्रार दाखल करण्यात आली असून स्वतंत्र उच्चस्तरीय तपास डीएसपी लक्ष्मणगड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तपासणीनंतर एसएचओ आणि गुन्हा नोंद न केलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -