घरताज्या घडामोडीRajasthan Live Update : 'उद्या सकाळी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, सचिन पायलटला येण्याची...

Rajasthan Live Update : ‘उद्या सकाळी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, सचिन पायलटला येण्याची विनंती’

Subscribe

राजस्थानच्या मनसेर मधील हॉटेलमध्ये काँग्रेस आमदार एकत्र. आमदार इंजर गुजर, पी आर मीना, जी आर खताना आणि हरिष मीना यांच्यासह इत आमदारांचा समावेश या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

- Advertisement -

काँग्रेसचे प्रवक्ते रणजित सुरजेवाल यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना राजस्थानमधील काँग्रेस सरकार स्थिर असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंब म्हटलं की वाद विवाद होणारच, त्यामुळे काँग्रेसच्या या कुटुंबातील वाद, नाराजी सोडवण्याचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेस प्रमुखांचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. यावी आणि चर्चा करावी, असे त्यांनी म्हटले आहे. राजस्थानमधील सरकार कोणीही पाडू शकत नाही. गेल्या ४८ तासात मी सचिन पायलट यांच्याशी अनेकदा बोललो आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, असेही सुरजेवाल म्हणाले.

- Advertisement -

राजस्थानमधील राजकीय उलथापालथवर काँग्रेसचे आमदार दानिश अब्रार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, इथे कोणताही नंबर गेम नाही. अजूनही काँग्रेसकडेच बहुमत आहे. आमच्याकडे बहुमतापेक्षा जास्तच आकडे आहेत. काँग्रेसचे १०९ आमदार आहेत.


काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमधील राजकीय घडामोडींवर प्रसार माध्यमातून येणाऱ्या वृत्तांसंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. चुकीच्या आणि गोंधळाच्या बातम्या या पसरवल्या जात आहेत. त्यामुळे उद्यापासून मीच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवेन असे, ट्विट त्यांनी केले आहे.


सचिन पायलट यांनी अद्याप कोणत्याही वाटाघाटीच्या चर्चा झाल्या नसल्याचे सांगितले आहे. तसेच कोणत्याही प्रमुख नेत्याशी बोलणे झाले नाही. शिवाय बहुमतासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे पुरेसे आमदार नसून केवळ ८४ आमदारच त्यांच्यासोबत असल्याचे पायलट गटाकडून सांगण्यात येत आहे.


अभिनेता रितेश देशमुख यांनीही शेवटचा उपाय या दोन शब्दात राजस्थानमधील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.


राजस्थानचे कॅबिनेट मंत्री रमेश मीना यांनी सचिन पायलट यांच्यासोबत जाणार असल्याचे म्हटले आहे.


मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या घरी आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीला २० आमदारांनी हजेरी लावली नाही.


सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयाने दिल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.


भाजप नेते अमित मालविया यांनी अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राजस्थानमधील राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे.


राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांना १०९ आमदारांचा पाठिंबा आहे, त्यापैकी १०४ आमदार उपस्थित आहेत तर पाच आमदारांनी पाठिंबापत्रे सादर केली आहेत. सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ केवळ १७ आमदार आहेत. सध्या पक्षाच्या हाय कमांडने सचिन पायलट यांना परतण्यास सांगितलं आहे. पक्षाने सचिन पायलट यांना निरोप पाठवला आहे की आम्हाला तुमच्याविषयी प्रेम आहे. आम्ही तुमचा आदर करतो. आम्ही मुक्त मनाने आपलं स्वागत करण्यास सज्ज आहोत. कृपया परत येऊन बोला.


राजस्थानमधील काँग्रेस सरकार राजकीय संकटातून जात असून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत गेहलोत यांच्या पाठिंब्याचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले,”जेव्हा ते (भाजप) लोकशाही पद्धतीनं निवडणुका जिंकू शकत नाही. तेव्हा ते ईडी, सीबीआय आणि इतर यंत्रणा घेऊन येतात. यासाठी इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही,” अशी टीका गेहलोत यांनी भाजपावर केली. दरम्यान, सचिन पायलट यांनी वाटाघाटीचं सुत्रं पुढे केलं आहे.


जयपूरमध्ये कॉंग्रेसची विधिमंडळाची बैठक संपली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह आता सर्व आमदार बसमधून रिसॉर्टमध्ये जात आहेत.


कॉंग्रेसचे पाच मोठ्या नेत्यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल, पी. चिदंबरम आणि अहमद पटेल यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली आहे. सचिन पायलट यांना जयपूरला जाण्यास सांगण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अशी माहितीही येत आहे की सचिन पायलट आता वाटाघाटी करायला तयार आहेत. गृह आणि वित्त विभागासारखे महत्त्वाचे विभाग आपल्या समर्थक मंत्र्यांना देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडेच ठेवण्याची अटही व्यक्त केली आहे.


मध्य प्रदेशातील सत्ता गेल्यानंतर राजस्थानमधील काँग्रेसच्या सरकारवर अस्थिरतेचे संकट घोंगावू लागलं आहे. घोडेबाजाराच्या प्रकरणात नोटीस आल्यानंतर नाराज झालेले काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दिल्लीत असून, काँग्रेसकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांच्या कार्यालये व निवासस्थानावर आयकर विभागानी धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे राजस्थानात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. गेहलोत यांनी १०२ आमदारांचा दावा केला आहे, यावर सचिन पायलट यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हणत माझ्यासोबत २५ आमदार बसले आहेत असा दावा आता सचिन पायलट यांनी केला आहे. सध्या अशोक गेहलोत यांचं सरकार अस्तित्त्वात असल्याचं दिसत आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी प्रियंका गांधीं मैदानात उतरल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -