विधानसभेसाठी मी तयार आहे – रजनीकांत

विधानसभा निवडणुकीसाठी मी तयार आहे, मात्र, यासंबंधीत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भूमिका स्पष्ट केली जाईल, असे रजनीकांत यांने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Mumbai
प्रातिनिधीक फोटो
विधानसभेसाठी मी तयार आहे - रजनीकांत

टॉलिवूड सुपरस्टार रंजनीकात जेवढा चित्रपट क्षेत्रात लोकप्रिय आहे. तेवढाच तो राजकारणाच्या रिंगणात ही लोकप्रिय झाला. पण राजकारणात प्रवेश केल्यानंतर रजनीकांत पहिल्या लोकसभा निवडणुकीपासून दूर राहिले. मात्र, आता रजनीकांतला विधानसभा निवडणुकीसंबंधी विचारले असता, त्यांनी ‘मी विधानसभेसाठी तयार आहे’ असे सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल, असेहि रजनीकांतने सांगितले आहे. तसेच यासंबंधीत २३ मेनंतर सगळे स्पष्ट होईल, असेही रजनीकांतने सांगितले आहे.

विधानसभेसाठी लढणार

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी पून्हा सत्तेत येणार का?’ असे अभिनेता रजनीकांत याला माध्यमांनी विचारले असता, त्यावर रजनीकांत म्हणाला की, यासंबमधी २३ मेची वाट बघू असे सांगितले. तसेच तामिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ३८ जागा आहेत. तर विधानसभेसाठी १८ जागा आहेत. रजनीकांत आपल्या स्वतंत्र पक्षाची घोषणा करणार होते, पण अद्याप पक्षासंबंधीत कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, २०२१च्या विधानसभेमधील सर्व २३४ जागांवर लढणार असल्याचे रजनीकांत यांने सांगितले आहे. तसेच लोकसभा आणि पोटनिवडणुका लढणार नसल्याचे रजनीकांत यांने याआधीही स्पष्ट भूमिका घेतली होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here