घरदेश-विदेश'ममता बॅनर्जींनी सीबीआयच्या कामांमध्ये आडकाठी आणू नये'

‘ममता बॅनर्जींनी सीबीआयच्या कामांमध्ये आडकाठी आणू नये’

Subscribe

'ममता बॅनर्जींनी सीबीआयच्या कामांमध्ये आडकाठी आणू नये', असे केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले आहेत. ते लोकसभेमध्ये बोलत होते. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडलं.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय या सरकारी संस्थेच्या कामांमध्ये आडकाठी आणू नये, असे केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत म्हटले आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या नाट्याचे पडसाद लोकसभेत पाहायला मिळत आहेत. लोकसभेत या संदर्भात राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं. यावेळी लोकसभेत रणकंदन माजल्याचे पाहायला मिळाले. राजनाथ सिंह निवेदन देत असताना तृणमूलच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘सीबीआय तोता है‘, अशा घोषणाबाजी करुन लोकसभेचे संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी लोकसभेत भाषण केले.

‘हे म्हणजे संविधानाच्या मुल्यांना पायदडी तुडवणं आहे’

राजनाथ सिंह म्हणाले की, ‘कायद्याच्या संस्थांना अटकाव करणं कायद्याच्या देशहिताचे नाही. या संस्थानांना काम करण्यापासून रोखले तर व्यवस्थेचे तीन-तेरा वाजतील. केंद्र सरकारने नेहमीच राज्यांचा अधिकाराचा सन्मान केला आहे. त्यामुळे राज्यांनीही क्रेंद्र सरकारचा सन्मान केला आहे. पोलीस हे राज्यांतर्गत येतात. कालची घटना पाहता, हे योग्य नाही. असा प्रकार म्हणजे संविधानाच्या मुल्यांना पायदडी तुडवणं आहे. यासंदर्भात माझं राज्यपालांशी बोलणं झालं आहे. मी त्यांच्याकडून घडलेल्या सर्व प्रकाराचा रिपोर्ट मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारी संस्थांना काम करण्यापासून रोखू नये’.

- Advertisement -

‘चिटफंड घोटाळ्यातील आरोपींना राजकीय संरक्षण दिलं जातय’

राजनाथ सिंह म्हणाले की, ‘कोलकत्यामध्ये सीबीआय अधिकाऱ्यांना त्यांचे काम करण्यापासून रोखण्यात आलं. हे इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. चिटफंट घोटाळ्याप्रकरणी आरोपींना राजकीय संरक्षण दिलं जात आहे. दरम्यान, राजनाथ सिंह यांच्या भाषणावेळी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत घोषमाबाजी करत मोठा गदारोळ केला’. त्यामुळे लोकसभा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -